Margao: मुलांना पळविणारी टोळी ही केवळ अफवा; पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया

दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांच्याकडून खुलासा
पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया
पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया दैनिक गोमन्तक
Published on: 
Updated on: 

फातोर्डा: राज्यात मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या प्रकरणावर पोलीस अधीक्षकांनी खुलासा दिला आहे. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी मुलांना पळविणारी टोळी ही केवळ अफवा असून, यात काही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. धनिया यांनी मडगाव (Margao) येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया
PFI सोबत संपर्काच्या संशयावरून माजी नगराध्यक्ष सैफुल्ला खानसह इतरांना ताब्यात घेऊन नंतर सुटका

पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया म्हणाले, दक्षिण गोव्यात मुले पळविण्यात येत असल्याबद्दल अफवा पसरविण्यात येत आहे यात मोतीडोंगर, फातोर्डा व वास्को या ठिकाणी मुले पळविण्यात आल्याबद्दल तिघांना मारझोड करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याची माहिती गोळा करण्यात येत आहे . मात्र पकडण्यात आलेल्या या तीन संशयित आरोपीबद्दल मुले पळविण्याच्या प्रकरणात सहभागी असल्याचा कोणताही पुरावा अजून पर्यंत सापडला नाही.

तसेच, अशा प्रकारच्या अफवा पसरणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांपासून असले कोणतेही प्रकरण गोव्यात घडले नसल्याचाही धनिया यांनी खुलासा केला. या विषयी पोलीस वेळोवेळी पेट्रोलिंग करीत असून तरी असल्या प्रकाराबद्दल सर्वानी सतर्क रहायला हवे अशा प्रकरणाच्या अफवा 01 सप्टेंबर पासून सुरु झाल्या असून गोव्यासहित बिहार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्येही अशा प्रकारच्या अफवा पसरविण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com