Goa Tourist Places संरक्षण & देखभाल कायदा सुधारणा; कारावासाची तरतूद रद्द, दंडाची रक्कम वाढवली

यापूर्वी कायद्याचे उल्लंघन केल्यास 3 महिने ते 3 वर्षे कारावास किंवा रु. 5,000 दंड अशी शिक्षांची तरतूद होती.
Goa Tourist Places
Goa Tourist PlacesDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा पर्यटन स्थळ संरक्षण आणि देखभाल कायदा (Goa Tourist Places Protection and Maintenance act) सुधारणा अंतर्गत कारावासाची तरतूद रद्द करण्यात आली आहे. तर, या कायद्याचे उल्लंघन केल्यास केल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. गोवा सरकारने (Goa Government) याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Goa Tourist Places
Margao: मुलांना पळविणारी टोळी ही केवळ अफवा; पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया

सरकारच्या अधिसूचनेत काय म्हटले आहे

गोवा पर्यटन स्थळ संरक्षण आणि देखभाल कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या किंवा दिलेल्या कोणत्याही आदेशाचे किंवा निर्देशांचे पालन करण्यात करत नाही. आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी किंवा व्यक्तीला अधिकार वापरण्यास अडथळा निर्माण करतो. अशा व्यक्तीला 5000 रुपयांपासून 50,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

गोवा पर्यटन स्थळे (संरक्षण आणि देखभाल) (सुधारणा) कायदा, 2022, 22 जुलै 2022 रोजी गोवा विधानसभेत मंजूर करण्यात आला. राज्यपाल पी.एस पिल्लई यांनी आणि 5 सप्टेंबर 2022 रोजी या कायद्याला मंजुरी दिली.

गोवा पर्यटन स्थळे संरक्षण आणि देखभाल कायद्यांतर्गत यापूर्वी, कायद्याचे उल्लंघन केल्यास 3 महिने ते 3 वर्षे कारावास किंवा रु. 5,000 दंड किंवा दंड आणि कारावास अशी दोन्ही शिक्षांची तरतूद होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com