Goa Petrol-Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांमध्ये वाढ; जाणून घ्या आजचे दर

इस्त्रायल हमास युद्धाचा तेल उत्पादक राष्ट्रांवर परिणाम शक्य
Goa petrol Diese prices
Goa petrol Diese pricesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Petrol-Diesel Prices 13 November 2023: इंधनाच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात आणि त्या नियमितपणे सुधारल्या जातात. त्यावर चलन विनिमय दर, कच्च्या तेलाच्या किंमती, जागतिक संकेत इंधनाची मागणी या घटकांचा परिणाम होत असतो.

सोमवारी 13 नोव्हेंबर रोजी गोव्यातील इंधन दरांमध्ये किरकोळ बदल झाले. उत्तर गोवा आणि पणजीतील डीझेल दरात प्रतीलीटर 0.18 पैशांनी घट झाली. तर दक्षिण गोव्यातील डीझेल दरामध्ये 0.11 पैशांनी वाढ झाली.

उतर गोवा आणि पणजीतील पेट्रोल दरांत 0.19 पैशांनी वाढ झाली. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दर प्रतीलीटर 0.11 पैशांनी वाढले.

इस्त्रायल-हमास युद्धाचा परिणाम आखातातील देशांवर थेटपणे होत असल्यामुळे आखातातील तेल उत्पादक देशांमध्ये तणाव आहे. त्याचा परिणाम खनिज तेल उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर तेलाच्या किंमतींवर दबाव आहे.

Goa petrol Diese prices
Adhaar Pan Card Link: सरकारने 11.5 कोटी पॅनकार्ड केली डीएक्टिवेट, तुमचे कार्ड आहे का?

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.35

Panjim ₹ 97.35

South Goa ₹ 97.22

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.92

Panjim ₹ 89.92

South Goa ₹ 89.79

Goa petrol Diese prices
Netflix, Hotstarसह डिजिटल मीडियाची मक्तेदारी संपणार, सरकार आणणार नवा कायदा

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट

आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com