Adhaar Pan Card Link: सरकारने 11.5 कोटी पॅनकार्ड केली डीएक्टिवेट, तुमचे कार्ड आहे का?

Adhaar Pan Card Link: भारत सरकारने देशभरातील 11.50 कोटी पॅनकार्ड डीएक्टिवेट केली आहेत. कारण ते निर्धारित वेळेत आधारकार्डशी लिंक झाले नव्हते.
Adhaar Pan Card Link
Adhaar Pan Card LinkDainik Gomantak

Adhaar Pan Card Link: भारत सरकारने देशभरातील 11.50 कोटी पॅनकार्ड डीएक्टिवेट केली आहेत. कारण ते निर्धारित वेळेत आधारकार्डशी लिंक झाले नव्हते. या 11.50 कोटी पॅनकार्डपैकी, जर तुमचे पॅनकार्ड देखील डीएक्टिवेट झाले असेल तर काळजी करु नका, तुम्ही ते सहजपणे सक्रिय करु शकता.

मात्र, यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. CBDT म्हणजेच केंद्रीय संचालक मंडळाने माहिती दिली आहे की, 30 जून 2023 ही पॅन आणि आधारकार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख होती, त्यानंतर देशभरातील 11.5 कोटी पॅनकार्ड डीएक्टिवेट करण्यात आली आहेत.

70 कोटींहून अधिक पॅन कार्ड वापरकर्ते

सध्या भारतात (India) सुमारे 70 कोटी पॅनकार्ड वापरकर्ते आहेत, त्यापैकी 57 कोटी लोकांनी त्यांचे पॅनकार्ड आधारशी लिंक केले आहे. तर अजूनही 12 कोटी लोक आहेत, ज्यांना ही प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. या 12 कोटींपैकी 11.5 कोटी पॅनकार्ड सरकारने डीएक्टिवेट केली आहेत.

Adhaar Pan Card Link
Adhaar-Pan Link: 'या' तारखेपर्यंत आधारशी लिंक न केल्यास पॅन कार्ड होईल निष्क्रीय, तुम्ही केले का?

दंडासह सक्रिय करु शकता

दरम्यान, जर तुमचे कार्ड डीएक्टिवेट केले गेले असेल आणि तुम्हाला ते पुन्हा सक्रिय करायचे असेल तर तुम्हाला 1,000 रुपये दंड भरावा लागेल, त्यानंतरच तुमचे कार्ड पुन्हा सक्रिय केले जाईल. नवीन पॅनकार्ड घेण्यासाठी तुम्हाला फक्त 91 रुपये भरावे लागतील. म्हणजेच सरकार 10 पट अधिक दंड आकारत आहे.

पॅनकार्ड लिंक न केल्यास काय अडचणी येतील?

तुमच्या मनात प्रश्न येत असेल की, पॅन आणि आधार लिंक न केल्यामुळे काय समस्या निर्माण होतील? तर बघा, तुम्ही आयकर परतावा भरु शकणार नाही, तुम्ही डिमॅट खाते उघडू शकणार नाही आणि म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये (Share Market) खरेदी-विक्री करु शकणार नाही.

याशिवाय, कार किंवा घर खरेदीवर जास्त कर भरावा लागेल. बँकेत एफडी आणि बचत खातीही उघडली जाणार नाहीत. त्यामुळे अनेक समस्या आहेत, जर तुम्ही तुमचे पॅनकार्ड आधारशी लिंक केले नसेल तर लवकरात लवकर करा. जर पॅनकार्ड डीएक्टिवेट केले असेल, तर 1000 रुपये भरुन ते पुन्हा सक्रिय करुन घ्या.

Adhaar Pan Card Link
PAN-Aadhar Linking: 30 जूनपर्यंत पॅन-आधार लिंक करा; अन्यथा होईल ही कारवाई

पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे कसे जाणून घ्यावे

आता तुम्हाला तुमचे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक आहे की नाही हे कसे कळेल याची प्रक्रिया देखील जाणून घेतली पाहिजे. त्यामुळे तुमच्या फोन नंबरवरुन 567678 वर UIDPAN टाईप करा, 12 अंकी आधार क्रमांक, स्पेस टाका आणि नंतर 10 अंकी पॅनकार्ड क्रमांक टाका आणि पाठवा. जर तुमचे पॅनकार्ड आधारशी लिंक असेल तर त्याचा मेसेज तुमच्यापर्यंत येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com