Korgao Gramsabha: गोंधळ, वादावादी, पंच-सरपंच भिडले, अखेर नागरिकांचा हस्तक्षेप

कोरगाव ग्रामसभा : आमदार प्रवीण आर्लेकर यांना मंत्रिपद देण्याची मागणी
Korgao Gramsabha
Korgao GramsabhaDainik Gomantak
Published on
Updated on

Korgao Gramsabha कोरगाव ग्रामसभेत रविवारी ग्रामस्थ व पंच, सरपंच एकमेकांना भिडले, त्यामुळे ग्रामसभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही पंच तसेच नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत झाले. त्यानंतर सभा पुन्हा सुरु झाली.

या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. पेडणे विधानसभा मतदारसंघाची राखीवता काढून खुला करण्यात यावा, पेडणे आमदाराला मंत्रिपद द्यावे, गटार बांधकामातील घोळ, व्याघ्र प्रकल्प व्हावा या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, कचरा प्रकल्पाला जागा आदी विषयावर गरमागरम चर्चा झाली.

सरपंच समीर भाटलेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपसरपंच कल्पिता कलशावकर, पंच नीता नर्से, अनुराधा कोरगावकर, अब्दुल करीम नाईक, देविदास नागवेकर, लौकिक शेटये, उमेश चारी तसेच सचिव श्रद्धा कोरगावकर व निरीक्षक म्हणून पेडणे गटविकास कार्यालयातील अर्पिता शेट्ये आदी उपस्थित होते.

कोनाड येथील राहुल भगत यांनी यावेळी पंच अब्दुल करीम नाईक यांनी आपल्या घरासमोर शेती नसतानाही शेती असल्याचे दाखवून जलसंवर्धन खात्यातर्फे संरक्षक भिंत बांधून घेतली. तसेच आपल्या जमिनीला संरक्षण देण्यासाठी मुख्य रस्त्याजवळ आवश्यकता नसताना संरक्षक भिंत उभारली आहे.

एकाच कामासाठी वेगवेगळ्या सरकारी खात्यामार्फत निधी उचलला असून गटार बांधकामातही मोठा घोळ केलेला आहे, असा आरोप केला. तसेच पारंपरिक वाटेवर व्यावसायिक प्रकल्प आणण्यासाठी निविदा काढली आहे ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी इतर ग्रामस्थांनीही त्यांना साथ दिली.

यावेळी ग्रामस्थ व सरपंच समीर भाटलेकर व पंच देविदास नागवेकर यांच्याबरोबर जोरदार वादावादी झाली. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान ही पंच व इतर नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत झाले.

विविध ठराव संमत

या सभेत डोंगर कापणी तसेच बांधकामास परवानगी न देणे, तिस्क देवसू येथे कोणत्याही प्रकल्पास मान्यता न देणे असे ठराव संमत करण्यात आले. यावेळी पंच अब्दुल नाईक यांनी आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न केला पण ग्रामस्थांनी अनेक प्रश्‍न विचारून त्यांना भंडावून सोडले.

व्यंकटेश घोडगे यांनी पेडणे विधानसभा मतदारसंघ राखीवता हटवून खुला करावा, अशी मागणी केली. राजू नर्से यांनी पेडणेच्या आमदाराला मंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी केली. विकास गावडे यांनी भालखाजन येथे रस्त्याच्या बाजूला कचरा टाकण्याऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी सरपंच समीर भाटलेकर व सचिव कोरगावकर यांनी लवकरच कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार असल्याचे सांगितले.

Korgao Gramsabha
Goa Tiger Project: गाव, घरे, शेतजमिनी वगळूनच व्याघ्रक्षेत्र करा; वेळूस ग्रामस्थांचा आग्रह

व्याघ्र प्रकल्पाबाबत ठराव

व्याघ्र प्रकल्पाबाबतच्या न्यायालयाच्या आदेशाचे अभिनंदन करणारा सुदीप कोरगावकर यांनी ठराव संमत करण्यात आला. दोन वर्षापूर्वी कोनाड ते भटवाडीपर्यंत केलेल्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण उखडून गेले आहे, याबाबत मागच्या ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाचे काय झाले, याबाबत कोरगावर यांनी जाप विचारला.

वितोरीन फर्नांडिस यांनी भाईड येथे रस्त्यावर आलेली मोठी झाडे कापण्याची सूचना यावेळी केली. मोहन आरोलकार, नरेश कोरगावकर, दशरथ गावडे, आग्नेल नरोन्हा, डॉमनिक फर्नांडिस, ॲड. जगदीश कोरगावकर, आनंद कोरगावकर, वासुदेव भगत आदींनी चर्चेत भाग घेऊन आपली मते मांडली.

Korgao Gramsabha
Tiranga DP on Social Media: तिरंग्याचा डीपी ठेवला अन् ट्विटरने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांचे ब्लू टीक हटवले

गटार बांधकामात घोटाळा...

पंचायत क्षेत्रातील गटार बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप सुजित कोरगावकर यांनी केला. तसेच गटार उपसताना काढलेला कचरा तिथेच ठेवला आहे, हा कचरा पुन्हा गटारात वाहून जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावर कचरा टाकण्यासाठी जागा असल्यास सुचवावे, असे आवाहन सचिव कोरगावकर व सरपंच भाटलेकर यांनी यावेळी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com