Gomantak Home Ganesh Decoration Competition: अखिल गोवा पर्यावरणपूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा

गोमन्तक व रूद्रेश्‍वर, पणजीतर्फे 19 ते 25 सप्टेंबरपर्यंत आयोजन
Gomantak Home Ganesh Decoration Competition
Gomantak Home Ganesh Decoration CompetitionDainik Gomantak
Published on
Updated on

Gomantak Home Ganesh Decoration Competition राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असून बाप्पाच्या स्थापनेची लगबग सुरू झाली आहे. 19 रोजी श्री गणरायाची घरोघरी स्थापना होणार आहे.

यानिमित्ताने दैनिक ‘गोमन्तक’ आणि रूद्रेश्‍वर, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक अखिल गोवा घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. गणेश सजावटीचे फोटो 8010595332 या व्हॉट्सॲप क्रमांकावर 25 सप्टेंबर 2023 पर्यंत पाठविणे आवश्‍यक आहे.

Gomantak Home Ganesh Decoration Competition
Goa Monsoon 2023: दिवसभरात जोरदार पावसाची शक्यता; गोवा वेधशाळेने दिला यलो अलर्ट

गणेश उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणेशाचे सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने पूजन केले जाते. श्री गणेशाच्या या उत्साहात नेहमीप्रमाणे ‘गोमन्तक’ने आपली सामाजिक बांधीलकी जपत यंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या घरातील गणेश उत्सवात केलेली आरास तसेच पारंपरिक पर्यावरणपूरक तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटीचे दर्शन अवघ्या जगास दाखविण्याची संधी आपणास मिळणार आहे

बक्षिसाचे स्वरूप

  • प्रथम क्रमांक : रु. 7,000/-, चषक व प्रमाणपत्र

  • द्वितीय क्रमांक : रु. 5,000/-, चषक व प्रमाणपत्र

  • तृतीय क्रमांक : रु. 3,000/-, चषक व प्रमाणपत्र

  • पाच उत्तेजनार्थ बक्षिसे : प्रत्येकी रु. 1,000/-, चषक व प्रमाणपत्र

स्पर्धेचे असे आहेत नियम

  • गणेश सजावट ही पर्यावरण पूरक असावी.

  • सजावटीतून सामाजिक संदेश दिलेला असावा.

  • सजावटीमध्ये थर्माकोल व प्लास्टीकचा वापर टाळावा.

  • सजावटीमध्‍ये पारंपरिक बाबींचा समावेश असावा.

  • सजावटीचा फोटो आडवा असावा.

  • प्रत्येकी एकच फोटो व त्याला ॲटॅच जोडूनच स्पर्धकाचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक व इतर माहिती असावी.

  • सजावटीचा फोटो ‘गोमन्तक’च्या ८०१०५९५३३२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा.

  • गोव्यातील सर्वांसाठी ही स्पर्धा मोफत राहील.

  • सजावटीचा फोटो पाठविण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२३ राहील.

  • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

  • स्पर्धेचे न्यायालयीन क्षेत्र पणजी राहील.

  • स्पर्धेचे सर्व अधिकार संयोजन समितीकडे राखीव असतील.

Gomantak Home Ganesh Decoration Competition
Goa Ganesh Chaturthi: डिचोलीत ‘चवथीचो बाजार’ तर बाणस्तारीत 'माटोळीचो बाजारा'ला उत्साह

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com