Goa BJP: सत्तरीत स्त्री शक्तीचा जयजयकार, मेळाव्याला 26 हजारांची उपस्थिती

‘स्वाभिमान’चे धनादेश वाटप : 699 स्वयंसाहाय्य गटांना लाभ
Goa BJP, Sattari Program
Goa BJP, Sattari Program Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनकल्याणासाठी विविध योजना राबविल्या. या योजनांमुळे महिलांना सक्षम व आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत होत आहे. राज्यात भाजप सरकारतर्फे स्वयंसाहाय्य गटांना सक्षम बनविण्यासाठी खास स्वावलंबी योजना राबविण्यात आली.

या योजनेद्वारे महिलांनी आपला व्यवसाय सुरू करून स्वयंपूर्ण बनवावे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खास स्त्री शक्ती मेळाव्यात केले.

भूमिका मैदानावरील महामेळाव्यात एकूण २६ हजारांची उपस्थिती होती. सत्तरीतील 528 स्वयंसहाय्य गटांना व उसगाव येथील 171 स्वयंसहाय्य गटांना स्वाभिमान योजनेचा लाभ झाला आहे. गायिका अनुराधा पौंडवाल यांची मेळाव्यासाठी खास उपस्थिती होती. त्यांनी गणेश चतुर्थीनिमित्त व मेळाव्यानिमित्त सुरेल भजन सादर केले.

या मेळाव्यात स्त्री शक्तीचा जय जयकार करण्यात आले.

व्यासपीठावर खासदार सदानंद तानावडे, आमदार डॉ. दिव्या राणे, वाळपई नगराध्यक्ष शैहजीन शेख, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजश्री काळे, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, उसगाव जि.पं. सदस्य उमाकांत गावडे, विनोद शिंदे, होंडा सरपंच शिवदास माडकर, पिसुर्ले सरपंच देवानंद परब, ठाणे सरपंच सरिता गावस, तसेच सर्व पंचायतीचे सरपंच, पंच, नगरसेवक व इतरांची उपस्थिती होती.

आमदार विश्वजीत म्हणाले, आज हा कार्यक्रम खास सत्तरीतील महिलांसाठी आयोजित केला असून नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ही योजना अमलात आणताना अत्यंत आनंद होत आहे. पणजी शहरासारख्या सोयीसुविधा सत्तरीत उपलब्ध होणार आहेत.

आज महिलांमध्ये अनेक आरोग्याच्या समस्या वाढत आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी योग्य प्रकारे घेतली पाहिजे. सत्तरीच स्त्री शक्तीचा आदर व सन्मान सर्वांना कर, असेही ते म्हणाले.

खासदार सदानंद तानावडे म्हणाले, देशाच्या विकासात नरेंद्र मोदी यांचा मोठा वाटा आहे. आरोग्यमंत्री व दिव्या राणेमुळे सत्तरीत विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोचल्या आहेत.

डॉ. दिव्या राणे म्हणाल्या, आज महिलांचा दिवस असून सत्तरी, पर्येचा विकास मोदींमुळेच होत आहे. आमदार डॉ. दिव्या राणेसह जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच व इतर महिलांनी फुगडी घातली.

Goa BJP, Sattari Program
Gomantak Home Ganesh Decoration Competition: अखिल गोवा पर्यावरणपूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com