Taleigao: वांगी, आंबा, तांदूळ, काजू बोंडेसाठी GI दर्जा मिळालेले; विशिष्ट मातीच्या गुणधर्माचे 'ताळगाव'

Taleigao Village Goa: ताळगांवची वांगी, मांगेलाल आणि मुशेराद आंबा, कोरगुट तांदूळ, काजू बोंडे या उत्पादनांना ‘जीआय’ निबंधकांनी ‘जीआय’ दर्जा बहाल केला आहे.
GI Tagged Products Goa
GI Tagged Products GoaDainik Gomantak
Published on
Updated on

ताळगांवची वांगी, मांगेलाल आणि मुशेराद आंबा, कोरगुट तांदूळ, काजू बोंडे या उत्पादनांना ‘जीआय’ निबंधकांनी ‘जीआय’ दर्जा बहाल केला आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी आणि आमच्या ताळगाववासीयांनी आनंद व्यक्त केला आहे.

ताळगावच्या मातीला विशिष्ट असा गुण आहे, म्हणूनच इथला भाजीपाला गोवेकरांच्या आवडीचा बनला आहे. येथील शेतकरीही काबाडकष्ट करून जगणारे आहेत. जीआय टॅगमुळे ताळगावच्या मातीचा एकप्रकारे गौरव झाला आहे. त्याचाच मोठा फायदा आता शेतकरीवर्गाला होणार आहे. ताळगावलाही शहरीकरणाची अपरिहार्य असणारी तशी लागण झाली आहे. पण वाढत्या इमारतींच्या कोंदणातही ताळगावने आपलं गावपण जपण्याचा कसोशीने प्रयत्न चालवला आहे.

इथले शेतकरी रात्रंदिवस सुपीक जमिनीत काबाडकष्ट करून मोठ्या प्रमाणात शेती पिकवितात. ताळगावच्या शेतात मुळा, भेंडी, वांगी, तांबडी भाजी, पांढरी भाजी, वाल, गावठी पपई, चिटकी, कणगां, कलिंगड, हिरवी मिरची अशा प्रकारच्या गावठी भाज्यांची लागवड ताळगावच्या शेतात केली जाते. अनेक दूरवरून येणारे लोक या ताज्या भाज्या विकत घेण्यासाठी मुद्दामहून ताळगांवला भेट देतात. इथे भातपीकही मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

इथे कणसं मोठी झाली की, ती कापली जातात आणि ती कणसं वाजत गाजत गोवा राज्याच्या राज्यपालांना त्यांच्या राजभवनात (लोकभवन) नेऊन दिली जातात, अशी प्रथा आहे. यालाच ‘कणसाचे फेस्त’ म्हणतात. ताळगावचा माणूसही अगदी सर्वांवर प्रेम करणारा, सर्वांना आपलंसं करणारा, हा या मातीचाच गुण. कोरोनाच्या काळात बेळगावहून भाज्यांची आयात जेव्हा बंद झाली, गावभरातले लोक सगळेजण ताळगावात येऊन ताजी भाजी घेऊन जायचे.

GI Tagged Products Goa
Masorde: सफर गोव्याची! रानवनांनी - नद्यांनी वेढलेले, औषधी पाण्याचा प्रवाह असणारे 'मासोर्डे'

गोव्याचे किंवा गोमंतकीयांचे पोट मासळी खाल्ल्याशिवाय भरतच नाही. ताळगावकरही त्याला अपवाद नाहीत. ताळगावात देशाच्या विविध भागांतून कामधंद्यासाठी वा रोजगारासाठी येणाऱ्या तरुणांच्या झुंडीही दिसतात. ताळगावच्या बाजारात कामाच्या शोधात असलेल्या या बेरोजगार तरुणांचा जणू बाजारच भरतो. पण ताळगाववासीय किंवा गोव्यातील जनता या लोकांना रोजगार देऊन सामावून घेते.

GI Tagged Products Goa
Goa Tourism: सफर गोव्याची! चोर्ला घाटातून दिसणारा 3 नद्यांचा उगम, पोर्तुगीज पुस्तकात रेखाटलेले गुळ्ळेच्या धबधब्याचे सुंदर चित्र

ताळगावात जसे कष्टकरी शेतकरी आहेत, तसेच कष्टकरी रापणकारही आहेत. इथे मच्छिमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात तेजीत चालतो. जशी ताळगावची ताजी भाजी मिळणार तसे इथे ताजे रापणाचे मासेही मिळतात, आणि ही रापणाची मासळी घ्यायलाही विविध भागांतून लोक -ताळगावात येतात. ताळगावचे रापणीचे ‘करबट’ खूप प्रसिद्ध आहे. गावाच्या मातीत पिकणाऱ्या वांगीची राष्ट्रीय पातळीवर भौगोलिक ओळख निर्माण झाल्याने स्थानिक शेतकरी व नागरिक आनंदीत आहे. माझ्या गावाची मातीच तशी विविध वैशिष्ट्यांनी भरलेली आहे.

शेखर वासुदेव खांडेपारकर,

चिंचोळे - ताळगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com