Cashless Kadamba: गोव्यात विना कंडक्टर धावणाऱ्या इलेक्ट्रीक बसेसला कमी प्रतिसाद का मिळतोय? वाचा प्रवाशांचं मत

Goa Cashless Bus Service: ही सिस्टम स्थानिकांना मान्य नसल्याने बसमधल्या प्रवाशांची संख्या खूप कमी झाली आहे
EV Bus Goa
EV Bus GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मागच्या एक महिन्यापासून स्मार्ट सिटी अंतर्गत ज्या इलेक्ट्रिक बसेस चालत आहे त्या बसमध्ये स्मार्ट ट्रान्झिट कार्ड आणि काही बसमध्ये कॅशलेस सिस्टम चालू केलेलीआहे, मात्र ही सिस्टम स्थानिकांना मान्य नसल्याने बसमधल्या प्रवाशांची संख्या खूप कमी झाली आहे. लोकांना ट्रान्झिट कार्डची सिस्टम कळत नसल्याने प्रवासी खासगी बसचा प्रवास करणं सोयीचं समजत आहेत.

स्मार्ट सिटीच्या इलेक्ट्रिक बसमध्ये कंडक्टर नसून या बसेस कॅशलेस केल्या गेल्या आहेत आणि याचाच प्रवाशांना भरपूर त्रास होतोय. काही प्रवाशांच्या म्हणण्याप्रमाणे ते दररोज कदंबाच्या स्मार्ट बसने प्रवास करत नाहीत, आणि कधीतरी प्रवास करताना त्यांना सर्व प्रक्रिया पुन्हा करावी लागते, हे काम वेळखाऊ आहे आणि समजायला देखील अवघड असल्याचं प्रवासी म्हणाले आहेत.

EV Bus Goa
Kadamba Bus: ‘कदंब’ पुन्‍हा अवघड वळणावर! आर्थिक वर्षात 2 कोटी 65 लाखांचा तोटा

वयस्क माणसांना हा प्रवास झेपणारा नाही, कारण पैसे देण्याची प्रक्रिया क्लिष्ट आणि घडबडीची आहे. एकवेळ आम्ही शिकून घेऊ मात्र वयस्क लोकांसाठी ही प्रक्रिया बरीच कंटाळवाणी असेल असं काही प्रवासी म्हणाले आहेत आणि म्हणून ही सिस्टम आम्हाला मान्य नाही असं लोकांचं म्हणणं आहे.

त्याचबरोबर कॅशलेस गाड्या असल्यामुळे कंडक्टरचं काम ड्रायव्हर्सना करावं लागतंय. ड्रायव्हरने गाडी चालवावी, प्रवाशांना सांभाळावं की रस्त्यावर लक्ष द्यावं असा प्रश्न ड्रॉयव्हर्सनी उपस्थित केला आहे. प्रवाशांना अजूनही स्मार्ट ट्रान्झिट कार्डचा वापर कसा करावा हे समजत नाही, ते गडबडून जातात आणि अशावेळी गाडीवरचं लक्ष हटवून प्रवाशांना समजावणं ड्रॉयव्हर्सना शक्य होत नसल्याने कॅशलेस बसेस जरी केल्या तरी सरकारने बसमध्ये कंडक्टर ठेवलेच पाहिजे अशी मागणी ड्रॉयव्हर्सनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com