Goa Cashless Bus Service: गोमंतकीयांच्या सेवेत...! पणजीतील ग्रीन मार्गावर कॅशलेस बससेवा सुरु

Cashless Bus Service In Panaji: पणजी शहरातील ग्रीन मार्गावर १६ डिसेंबरपासून कॅशलेस बससेवा सुरू झाली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा कदंब महामंडळाने केला आहे.
Goa Cashless Bus Service: गोमंतकीयांच्या सेवेत...! पणजीतील ग्रीन मार्गावर कॅशलेस बससेवा सुरु
EV Cashless Kadamba GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजी शहरातील ग्रीन मार्गावर १६ डिसेंबरपासून कॅशलेस बससेवा सुरू झाली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा कदंब महामंडळाने केला आहे. कॅशलेस सेवा केवळ विजेवरील बससाठी असून एकूण ७ मार्गांवर ती कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे महामंडळाने घोषित केले होते.

सध्‍या पणजी (Panaji) ते आल्तिनो या ग्रीन मार्गावर कॅशलेस बससेवा सेवा सुरू झाली असून इतर ६ मार्गांवर सुरू होण्याच्या प्रक्रियेत आहे. कदंब वाहतूक महामंडळ आणि पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड यांच्या सहकार्याने ही सेवा राबवली जात आहे. ग्रीन मार्गावर सुरू झालेल्या बससेवेत सुरुवातीला कंडक्टर होते. मात्र, आता ही सेवा कंडक्टरशिवाय सुरू असून तिकीट प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. प्रवाशांनी बसमध्ये चढताना स्मार्ट कार्ड टॅप करायचे आणि उतरताना पुन्हा टॅप केल्यावर तिकिटाचे पैसे आपोआप कापले जातात.

Goa Cashless Bus Service: गोमंतकीयांच्या सेवेत...! पणजीतील ग्रीन मार्गावर कॅशलेस बससेवा सुरु
Panaji E-bus service: पणजीत ई-बस सेवेला गोमंतकीयांचा भरभरुन प्रतिसाद; रोज 'एवढे' हजार लोक करतायेत प्रवास!

कॅशलेस आणि कंडक्टरशिवाय सेवा ही सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या उपक्रमाचा लवकरच इतर मार्गांवरही विस्तार करण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

स्मार्ट कार्ड आणि पर्यायी सुविधा

कॅशलेस प्रवासासाठी स्मार्ट ट्रान्झिट कार्ड अनिवार्य आहे. आतापर्यंत १२०० हून अधिक प्रवाशांनी स्मार्ट कार्ड बनवले असून ही संख्या झपाट्याने वाढत आहे. कार्डची प्रोसेसिंग फी १५० रुपये असून, त्यात ७५ रुपयांचा कॅशबॅक (Cashback) मिळतो. कार्ड प्रत्येक महिन्याला रिचार्ज करावे लागते. कार्ड नसलेल्या प्रवाशांसाठी यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट खरेदीची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Goa Cashless Bus Service: गोमंतकीयांच्या सेवेत...! पणजीतील ग्रीन मार्गावर कॅशलेस बससेवा सुरु
E-Bus Service In Panjim: रंगावरुन ओळखा मार्ग! पणजीत 1 एप्रिलपासून धावणार 60 इलेक्ट्रिक बस; भाडे, मार्ग जाणून घ्या

प्रवास सोयीस्कर

‘टूमोक’ मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने प्रवासी क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट खरेदी करू शकतात तसेच अ‍ॅपवर बसचे रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट सुविधा उपलब्ध आहेत. या ग्रीन मार्गावरील सर्वाधिक तिकीट भाडे २० रुपये आहे, त्यामुळे कॅशलेस व्यवहारामुळे प्रवास सोयीस्कर आणि सुलभ झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com