Goa Education: '...तर आमचा एनईपीला विरोध नाही'; पालकांनी स्पष्ट केली भूमिका

Goa Parents Request Holiday For Students: मुलांना परीक्षेनंतर काही काळ म्हणजे किमान दोन आठवडे तरी सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी पालक सिसील रॉड्रिग्स यांनी केली.
Goa Education
Goa Parents Request Holiday For StudentsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Parents Demand Summer Break Before New Academic Year Starts in April

पणजी: राज्यातील शालेय मुलांच्या परीक्षा मार्चच्या 28 तारखेला संपतात आणि 1 एप्रिल रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होते. मुलांना परीक्षेनंतर काही काळ म्हणजे किमान दोन आठवडे तरी सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी पालक सिसील रॉड्रिग्स यांनी केली. ‘एससीईआरटी’ संचालक मेघना शेटगावकर यांना शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरु करावे. यासंबंधी राज्यातील विविध भागातून आलेल्या पालकांसमवेत निवेदन दिल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी

दरम्यान, रॉड्रिग्स म्हणाल्या की, अनेकांचा असा समज झाला आहे की, आमचा नवीन शिक्षण धोरणाला विरोध आहे; परंतु आमचा ‘एनईपी’ला विरोध नसून त्याची ज्या पद्धतीने अंमलबजावणी केली जातेय त्याला आमचा विरोध आहे. एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवतो. राज्यातील अनेक शाळांमध्ये अजून योग्य पाण्याची सुविधा नाही. साधनसुविधांचीही कमतरता आहे. त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांना (Students) सुट्टी द्यावी.

Goa Education
CM Pramod Sawant: समुद्रकिनारी पिकनिक करु नका! सायन्स डे दिवशी मुख्यमंत्री असे का म्हणाले?

दहावी आणि बारावीच्या परीक्षेची पूर्वतयारी

इयत्ता नववीची प्रश्‍नपत्रिका गोवा शिक्षण मंडळाद्वारे काढण्यात येणार आहे. परंतु उत्तरपत्रिका ही शाळेतच तपासली जाणार आहे. काहींना ती बोर्डासारखी परीक्षा वाटत होती; परंतु विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेची पूर्वतयारी व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिलमध्ये शाळा सुरु करावी की नाही याबाबत बैठकीतून चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन आम्हाला देण्यात आल्याचे रॉड्रिग्स यांनी सांगितले.

Goa Education
CM Pramod Sawant: 30 मे पर्यंत गोव्यात कुणीही निरक्षर राहणार नाही; परप्रांतीयांना देखील सामावून घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुलांचे आयुष्य शिक्षणावर अवलंबून

एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरु करावे, असा केंद्र सरकारचा कोणताच निर्णय नाही किंवा नवीन शैक्षणिक धोरणातही सक्ती केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय बदलण्यात यावा. आमच्या मुलांचे आयुष्य शिक्षणावर (Education) अवलंबून आहे, त्याचा खेळ करु नये. त्यांच्यावर मानसिक ताण येणार नाही याची काळजी घ्यावी, असे रॉड्रिग्स यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com