Meritorious Students Felicitation Ceremony: शिक्षण निरंतर चालणारी प्रक्रिया, विद्यार्थ्यांनी आव्हाने स्वीकारायला सज्ज असावे

डॉ. हरिलाल मेनन : महिला व नूतन इंग्लिश हायस्कूलच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
School Program
School Program Dainik Gomantak
Published on
Updated on

School Program सध्‍याचे जीवन दररोज बदलत चालले आहे. सदाच नवनवे प्रयोग केले जाताहेत. त्यामुळे नवनवीन आव्हाने समोर उभी राहतात. या आव्हानांना तोंड देण्यासाठी व ती स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन गोवा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. हरिलाल मेनन यांनी केले.

कोंब-मडगाव येथील महिला व नूतन इंग्लिश हायस्कूलच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यास मेनन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सन्माननिय अतिथी म्हणून निवृत्त एअर मार्शल संदेश वागळे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसमोरील वेगवेगळ्‍या आव्हानांचा अभ्यास करूनच नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यात आले आहे. गोवा विद्यापीठानेही त्‍याचा अवलंब केला पाहिजे. जीवनात शिक्षण कधीही संपत नाही. ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या परिस्थिती, वेगवेगळे प्रश्र्न सदैव उभे राहत असतात.

तेव्हा विद्यार्थ्यांनी चलबिचल होऊन चालणार नाही, असे मेनन म्‍हणाले. गणित ही विज्ञानाची भाषा आहे. आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गणिताचा उपयोग होत असतो. काही विद्यार्थी दहावीतच गणित विषय सोडून देतात. असे करू नये, असे आवाहनही मेनन यांनी विद्यार्थ्यांना केले.

School Program
Margao Railway Station: मडगाव कोकण रेल्वेस्थानकाचा होतोय कायापालट...

समाज सेवा संघाचे अध्यक्ष सुदिन नायक यांनी सर्वांचे स्वागत केले. मुख्याध्यापिका रिचा कामत यांनी दहावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा निकालांचा आढावा घेतला तर सचिव सनत पै रायतुरकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौरवपात्र विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षकांनी अभिनंदन केले.

School Program
त्याच जागी, आजच होणार शिवरायांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना; आमदार कार्लुस फेरेरा लावणार हजेरी, पोलिसांना अल्टिमेटम

शिक्षका शांता वागळे यांचा सत्कार

निवृत्त एअर मार्शल संदेश वागळे यांनी हवाई दलातील आपले वेगवेगळे अनुभव कथन केले. हवाई दलातील जीवन कसे असते याबाबत त्‍यांनी माहिती दिली. याप्रसंगी महिला नूतन हायस्कूलच्या 1958 सालातील पहिल्या शिक्षिका शांता प्रभाकर वागळे यांचा सत्कार करण्यात आला.

School Program
Panjim Solar City: CM सावंत म्हणतात... पणजीत सौरऊर्जा पॅनलसाठी जागाच उपलब्‍ध नाही

आईवडील तसेच शिक्षकांना मुलांनी कधीही विसरू नये. जो शिक्षक विद्यार्थ्याला विचार करायला भाग पाडतो, तो आदर्श मानला जातो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्‍त गुण ओळखून त्यांना त्याप्रमाणे मार्गदर्शन केले पाहिजे.

- डॉ. हरिलाल मेनन, गोवा विद्यापीठाचे कुलगुरु

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com