Goa Crime: वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पणजीत 338 CCTV कॅमेरे

Panjim News: सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांना तपासकामासाठी वरदान ठरणार आहेत.
Goa Crime | CCTV Camera
Goa Crime | CCTV CameraDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim: राज्याची राजधानी असलेल्या पणजीत स्मार्ट सिटी योजनेखाली शहरामध्ये 86 ठिकाणी 338 सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर ते सुरू करण्यात आले असून त्याचा कंट्रोल रूम आल्तिनो - पणजीतील आयटी इमारतीत असणार आहे.

वाढणाऱ्या गुन्हेगारांची या सीसी टीव्ही कॅमेऱ्यातून माहिती मिळवणे सोपे होणार आहे. त्यामुळे हे सीसी टीव्ही कॅमेरे पोलिसांना तपासकामासाठी वरदान ठरणार आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे.

Goa Crime | CCTV Camera
Panaji Police: पर्यटकांना धाक दाखवत दागिने लुटणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

गोवा इंटेलिजन्ट सिटी मॅनेजमेंट सिस्टीम (जीआयसीएमएस) मार्फत स्मार्ट सिटी योजनेखाली हा प्रकल्प होणार आहे. त्यामध्ये सीसी टीव्ही कॅमेरे याच्याव्यतिरिक्त इतर 11 सुविधांचाही समावेश आहे. सिटी सर्वेलन्‍स हा त्यापैकी एक प्रकार असून एकूण या प्रकल्पावर सुमारे 183 कोटी खर्च करण्यात येणार आहे. या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा वापर वाहतुकीची कोंडी तसेच पार्किंगवर देखरेख ठेवण्यासाठी करून नागरिकांना चांगल्या प्रकारचे जीवन उपलब्ध करून देण्यामागील हेतू आहे.

पणजी शहरामध्ये चोवीस सर्व्हेलन्स मॉनिटरिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग हा पोलिस व वाहतूक खात्याचा तसेच पणजी महापालिकेचा असेल. या सीसी टीव्ही सर्व्हेलन्स कॅमेऱ्यांमध्ये फिक्स बॉक्स कॅमेरा सर्वसाधारण सर्व्हेलन्ससाठी एका ठिकाणी बसवले आहेत.

Goa Crime | CCTV Camera
Mormugao: कायद्याचा रक्षक बनला भक्षक; महिलेच्या विनयभंगप्रकरणी PSI वर गुन्हा दाखल

पॅन टिल्ट झूम (पीटीझेड) ज्यामधून 360 टक्के चित्र व त्यामध्ये झूम व्यवस्था असेल ज्यामधून काही अंतरापर्यंत झूम करून पाहता येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी संशयितांचे चेहरे ओळखण्यासाठी ऑटोमेटेड कॅमेरा बसविले आहेत. वाहन चालकांकडून वेगाचे उल्लंघन केले जाते त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅमेरा, जे वाहन चालक मोटार वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्या वाहनांचा क्रमांकपट्टीवरील क्रमांक डिटेक्ट होतो.

तसेच, त्यामुळे वाहतूक पोलिसांचेही काम सोपे होणार आहे. सध्या हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करून त्याची चाचणी घेतली जात आहे. पुढील दोन महिन्यात तो शहरभर सुरू होण्याची शक्यता आहे, अशी अधिकाऱ्यांनी दिली. नियंत्रण ठेवण्याचे काम आयटी हबमध्ये स्थापन करण्यात आलेल्या इंटीग्रेडेट कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) व डेटा सेंटरतर्फे होणार आहे.

Goa Crime | CCTV Camera
वाहनधारकांची कसरत थांबेना; जलवाहिनी फुटल्याचा परिणाम

सुदेश नाईक, उपअधीक्षक पणजी-

वाहन चोरीचे तर इतर गुन्हेगारीचे प्रमाण राज्यात वाढत आहेत. त्यामुळे सीसी टीव्ही कॅमेरे पोलिसांना तपासकामासाठी मदत करणारे आहेत. चोरी झाल्यावर संशयितांचे चेहरे त्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अनेकदा कैद होतात.

मात्र त्यानंतर रस्त्यावर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव असल्याने चोरट्याच्या हालचाली व कोणत्या दिशेने गेला, याचा थांगपत्ता लागत नाही. मात्र या अत्याधुनिक कॅमेऱ्यांमुळे पोलिसांचे काम सोपे होणार आहे. पणजी पोलिस स्थानकातील काही प्रकरणे या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे सोडवणे शक्य झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com