Lokotsav 2026: हडफडे आग दुर्घटनेचा लोकोत्सवावर परिणाम! स्टॉल्सच्या संख्येवर मर्यादा लागू; विक्रेत्‍यांना लाखोंचे नुकसान

Goa Lokotsav 2026: गोमंतकीयांना वर्षभर प्रतीक्षा लागून असलेल्‍या लोकोत्सवाचा प्रारंभ आज मंगळवारी कला अकादमीच्या दर्या संगमावर उत्‍साहात झाला. यंदाचा रौप्यमहोत्सवी लोकोत्‍सव आहे.
Lokotsav 2026
Lokotsav 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोमंतकीयांना वर्षभर प्रतीक्षा लागून असलेल्‍या लोकोत्सवाचा प्रारंभ मंगळवारी कला अकादमीच्या दर्या संगमावर उत्‍साहात झाला. यंदाचा रौप्यमहोत्सवी लोकोत्‍सव आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीत असल्यामुळे कला-संस्कृतीमंत्री रमेश तवडकर यांच्या हस्ते या दहा दिवसीय महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. यावेळी ‘पद्मश्री’ विनायक खेडेकर, कला-संस्कृती संचालक विवेक नाईक, क्रीडा संचालक अजय गावडे, कला अकादमीचे सदस्य सचिव शंकर गावकर, राजू गावकर, आनंद कवठणकर यांची उपस्‍थिती होती.

मान्यवरांनी दीपमाळ प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात केली. गोवा कला-संस्कृती खाते आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (जयपूर-राजस्थान) यांच्या संयुक्त विद्यमाने या २५व्या लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात देशभरातील १८ राज्यांतील स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. कला सादरीकरणासाठी त्‍यामुळे वाव मिळेल. विशेष म्हणजे हडफडे येथील नाईट क्‍लबमधील आग दुर्घटनेमुळे अग्निशामक दलाच्या नियमांनुसार स्टॉल्सच्या संख्येवर मर्यादा लागू झाली आहे. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी माटे यांनी आभार मानले.

२०-२५ परप्रांतीय विक्रेत्‍यांना लाखो रुपयांचे नुकसान

लोकोत्सवसाठी परराज्यांतून आलेल्या २० ते २५ विक्रेत्यांना स्टॉल्‍स न मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हडफडे आग दुर्घटनेमळे सुरक्षेच्या कारणास्‍तव यंदा स्टॉल्‍सची संख्या कमी करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे या विक्रेत्‍यांची पंचाईत झाली. किमान ३० लाख रुपयांच्यावर या विक्रेत्यांकडे साहित्य आहे. किमान दहा दिवस अगोदर आम्हाला आयोजकांनी तशी कल्‍पना द्यायला हवी होती, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Lokotsav 2026
Lokotsav 2026: रौप्यमहोत्सवी लोकोत्सवाबाबत मोठी अपडेट! महोत्सवासाठी तिकीट आकारण्याचा विचार; मंत्री तवडकरांचे सूतोवाच

हडफडे आग दुर्घटनेचा मोठा परिणाम

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्‍लबला लागलेल्‍या भीषण आगीत २५ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेमुळे यंदाच्‍या लोकोत्‍सवात अग्निशामक दलाच्या नियमांनुसार स्टॉल्सच्या रांगेतील अंतर राखले गेले आहे. सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना करण्यात आल्या असून, स्टॉल्सची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. उद्‌घाटनाच्या वेळेस अजूनही स्टॉल्सधारकांकडून सजावट सुरू होती.

Lokotsav 2026
Lokotsav: ..कधी जोकर, कधी डाकू, तर कधी राक्षस! 56 सोंगे धारण करून गोवा लोकोत्सव गाजवणारा बहुरुपी

राज्यभरातील लोकांना महोत्सवात आणणार

लोकोत्सव हा पणजीतील एकाच ठिकाणी होत असल्याने पर्यटक व नागरिकांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. दहा दिवस लोक या महोत्‍सवात सहभागी होतात.

मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले की, राज्यातील सर्व तालुक्यांमधील लोक या महोत्सवात येऊ शकतील, यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com