Pramod Sawant Statement: जो पदासाठी पात्र असेल ; त्यालाच नोकरी मिळेल

Pramod Sawant: रोजगाराबाबत पंतप्रधानांनी केले गोव्याचे अभिनंदन
CM Pramod Sawant | Goa News
CM Pramod Sawant | Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Pramod Sawant Statement: जो पदासाठी पात्र असेल, त्यालाच नोकरी मिळेल. काही लोक नोकरीत भ्रष्टाचार होत असल्याचा अपप्रचार करतात. अशा घटना घडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. आमचे सरकार ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या तत्त्वावर चालते. गोव्यातील प्रत्येक तरुणाच्या हाताला रोजगार मिळावा या संकल्पनेतून सरकार काम करत आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

तरुणांना रोजगार देण्याच्या दिशेने गोवा सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देशात जेथे भाजपची सरकारे आहेत तेथे रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. मोपा विमानतळामुळे गोव्यातील हजारो युवकांना रोजगार मिळेल.

पर्यटन वाढविण्यासाठी गोवा टुरिझम मास्टर प्लॅन पॉलिसी तयार करण्यात आली आहे. गोव्याच्या ग्रामीण क्षेत्रांना आर्थिक मजबुती देण्यासाठी पारंपरिक शेती रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आज ज्या युवकांना नियुक्तीपत्रे दिली त्यांना गोव्याच्या विकासासोबत देशाच्या विकासासाठी देखील कार्य करायचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने युवकांशी संवाद साधताना केले.

राज्यात 25 नागरिकांमागे एक सरकारी नोकर

राज्यात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या खात्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्रे देण्याचा हा पहिलाच कार्यक्रम असून या पूर्वी असे कधीच झालेले नाही. आजचा दिवस नियुक्तिपत्रे मिळालेल्या युवकांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी भाग्याचा आहे.

राज्यात 25 नागरिकांमागे 1 सरकारी नोकर आहे. मात्र, नियुक्तीपत्रे मिळालेल्यांनी जनतेला चांगली सेवा देता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

CM Pramod Sawant | Goa News
Vijai Sardesai Statement on Congress: काँग्रेस पक्षाने प्रभारी कर्नाटकी असल्याने बोटचेपी भूमिका घेतली

नोकऱ्या प्ररप्रांतीयांच्या घशात

गोव्यातील युवकांनी कौशल्य आधारित शिक्षण घेत स्वतःला प्रशिक्षित व अपग्रेड करणे गरजेचे आहे. पुढील पाच वर्षांत राज्यात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात 2 लाख नोकऱ्या उपलब्ध असतील त्यासाठी या क्षेत्रातील शिक्षण राज्यातील तरुणाईने घेणे गरजेचे असून अन्यथा या क्षेत्रातील नोकऱ्या इतर राज्यांतील नागरिक मिळवतील, असे मुख्यंमंत्री सावंत म्हणाले.

1,250 युवकांना नियुक्तिपत्रे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोेद सावंत म्हणाले की, आज सुमारे 1,250 युवकांना नियुक्तिपत्रे दिली. 400 ते 500 नोकऱ्या विविध सरकारी खात्यांत देण्यात आल्या. मोपा विमानतळावर 1,200 युवकांना रोजगार दिला तसेच कामगार आयोगाद्वारे आयोजित रोजगार मेळाव्यांद्वारे आतापर्यंत 1 हजार युवकांना नोकऱ्या दिल्यात. 1,000 युवकांच्या मुलाखती होत आहेत तर 2,000 जण या प्रक्रियेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com