Vijai Sardesai Statement on Congress: काँग्रेस पक्षाने प्रभारी कर्नाटकी असल्याने बोटचेपी भूमिका घेतली

Vijai Sardesai: म्हादई प्रश्न लोकांपर्यंत नेऊन दबाव आणण्याची गरज
Vijai Sardesai |Goa News
Vijai Sardesai |Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Vijai Sardesai Statement on Congress: काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे प्रभारी हे कर्नाटकचे नेते असल्यानेच म्हादईप्रश्नी दोन्ही बाजूंनी कर्नाटकच्याच भल्याचा विचार केला गेला. खरे तर मागच्या विधानसभा निवडणुकीत या एकाच प्रश्नावर काँग्रेसला भाजपला घरी पाठविण्याची संधी होती, पण काँग्रेस पक्षाने प्रभारी कर्नाटकी असल्याने बोटचेपी भूमिका घेतली आणि काँग्रेसने विजयाची संधी घालवली, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.

म्हादई बचाव आंदोलनाची पुढची दिशा कशी असावी हे ठरविण्यासाठी आज मडगाव येथील ‘गोंयकार घर’मध्ये बैठक झाली. त्यात आता हा मुद्दा रस्त्यावर आणून लोकांपर्यंत पोहचविण्याचा निर्णय घेण्यात आला. गरज पडल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत हा मुख्य मुद्दा करण्याचा विचार व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई, प्रशांत नाईक, मोहनदास लोलयेकर यांच्यासह काँग्रेसचे कॅ. विरीयातो फर्नांडिस, एल्विस गोम्स, ओलेंसीयो सिमोईस, पर्यावरण कार्यकर्ते फा. बोलमेक्स परेरा, ह्रदयनाथ शिरोडकर, विचारवंत दत्ता नायक तसेच सुमारे 200 सभासद उपस्थित होते.

Vijai Sardesai |Goa News
Nikhil Desai Statement Tourism: कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

‘सर्वपक्षीय मतभेद विसरून एकत्र या’

फा. बोलमेक्स परेरा यांनी हे आंदोलन लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली, तर ह्रदयनाथ शिरोडकर यांनी या आंदोलनाला राजकीय पाठिंबा देण्याची गरज व्यक्त केली. सर्वपक्षीय मतभेद विसरून सर्व गोवाप्रेमी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सर्व शक्तिनिशी हा प्रश्र्न धसास लावण्यासाठी प्रयत्न करण्यावर एकमत झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com