Goa News: पणजी शहराची स्वच्छतेत पीछेहाट!

Goa News: 2017 मध्ये शंभर शहरांमध्ये असणारे पणजी शहर आता 224 व्या स्थानावर घसरलेले आहे.
Garbage
GarbageDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim: स्वच्छतेच्या बाबतीत मध्यप्रदेशमधील इंदोर शहराने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर दुसऱ्या बाजूला स्मार्ट सिटी बनण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणाऱ्या पणजी शहराची स्वच्छतेच्या बाबतीत पीछेहाट होताना दिसत आहे.

2017 मध्ये शंभर शहरांमध्ये असणारे पणजी शहर आता 224 व्या स्थानावर घसरलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वर्षाकाठी महापालिका कचरा उचलण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे अठरा कोटी रुपये खर्च करीत आहे. असे असतानाही पणजी शहराची स्वच्छतेच्या बाबतीत झालेली पीछेहाट चिंतेचा विषय नक्कीच आहे.

Garbage
Goa Crime: हडफडे येथील चाकू हल्ल्याप्रकरणी आणखी चौघांना अटक

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने प्रत्येक वर्षी शहरांचे सर्वेक्षण केले जाते. त्याशिवाय 2017 मध्ये पणजी शहर स्वच्छतेच्या बाबतीत 90 व्या स्थानी होते. त्यानंतर 2022 मध्ये पणजी शहराची स्वच्छतेच्या बाबतीत 224 व्या स्थानी घसरण झाली, असून शहराला 2785.80 गुण मिळाले आहेत.

केंद्र सरकारच्या वरील खात्यातर्फे दरवर्षी असे सर्वेक्षण केले जाते. देशात सर्वांत प्रथम घरोघरी जाऊन कचरा संकलन करणारी महापालिका म्हणून पणजीची ओळख होती. परंतु अजूनही पूर्णपणे कचरा उचलला जात नसल्याचे यातून दिसते. त्यामुळेच शहराची पीछेहाट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Garbage
Panaji Police: पर्यटकांना धाक दाखवत दागिने लुटणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकताच स्वच्छ सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर केला, त्यातून गोव्याची पीछेहाट झाल्याचे स्पष्ट दिसते. महाराष्ट्रातील पाचगणी ही नगरपालिका 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात पहिल्या पाचमध्ये पहिल्या स्थानावर राहिली आहे.

माजी महापौराच्या मते कोणीही सध्या व्यवस्थितरीत्या शहराकडे पाहत नाही. पदावर बसलेली व्यक्ती आपल्याच दुनियेत मस्त आहेत. शहर विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध पद्धतीने कसा निधी आणायचा हे सत्तेवर बसलेल्यांना माहीतच नाही.

35 टन कचरा संकलित

पणजी शहरातून दररोज सुमारे 35 टन कचरा संकलित होतो, त्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा साळगावच्या कचरा प्रकल्पात पाठविला जातो. तर सुक्या कचऱ्यावर विविध ठिकाणच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पावर प्रक्रिया केली जाते. असे असूनही शहराची स्वच्छतेच्या बाबतीत झालेले पीछेहाट निश्‍चित चिंताजनक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com