Goa Monsoon Update: पाऊस मंदावला, बळीराजा धास्तावला! आणखी काही दिवस कोरडे जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज; भातशेतीवर संकटाची गडद सावली

Goa Paddy Farming: मान्‍सूनला २१ जूनपासून सुरुवात झाल्‍यानंतर राज्‍यभरातील शेतकऱ्यांनी भात लागवडीस सुरुवात केली खरी.
Paddy fields in Goa affected by weak monsoon rainfall under cloudy skies
Goa Monsoon UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : मान्‍सूनला २१ जूनपासून सुरुवात झाल्‍यानंतर राज्‍यभरातील शेतकऱ्यांनी भात लागवडीस सुरुवात केली खरी. परंतु, अनेक भागांतील लागवड पूर्ण झाल्‍यानंतर आता पुन्‍हा पावसाने दडी मारल्‍याने भात उत्‍पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ज्‍या भागांतील शेती केवळ पावसाच्‍या पाण्‍यावर अवलंबून आहे, तेथे पुढील चार-पाच दिवसांत पाऊस न पडल्‍यास पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होण्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे.

तसेच पावसाचे ढग भारताच्या पूर्वेकडे एकवटले असून सध्या पश्‍चिमेला तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज्‍यात यंदा उशिरा पाऊस सुरू झाला. त्‍यामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांनी लावलेले तरवे सुकून गेले होते. पाऊस न झाल्‍याने भाताची लागवड रखडली होती. त्‍यानंतर २१ जूनपासून पुन्हा पावसाने सुरुवात केल्‍यानंतर शेतकऱ्यांनी भात लागवडीस सुरुवात केली. परंतु, गेल्‍या चार दिवसांपासून

Paddy fields in Goa affected by weak monsoon rainfall under cloudy skies
Goa Assembly Monsoon Session 2026: सप्‍टेंबरपूर्वी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन, सभापतींनी दिली मोठी अपडेट; हालचालींना वेग

पावसाने पुन्‍हा दडी मारली असून पुढील सहा दिवस राज्‍यात पावसाची शक्‍यता नसल्‍याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्‍याने शेतकऱ्यांसमोरील चिंतेचे ढग आणखी गडद झाले आहेत. मागील १६ वर्षांच्या कारकिर्दीत म्हैसाळ धरणात गेल्या वर्षी २०२५ मध्ये जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता.

गेल्या वर्षीही पाऊस काहीसा विलंबाने पडला तरी पावसात सातत्य राहिल्यामुळे केवळ म्हैसाळच नव्हे, तर राज्यातील इतर धरणांतही मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला होता. मात्र, यंदा जुलैचा पंधरवडा होत आला तरी अजून पन्नास टक्केही पाणीसाठा नसल्याने आता सर्वस्वी पावसावरच विसंबून राहावे लागेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Paddy fields in Goa affected by weak monsoon rainfall under cloudy skies
Goa Monsoon: ...अजूनही सुमारे 44 टक्‍क्‍यांची तूट! पुढील आठवड्याभरासाठी 'यलो अलर्ट' जारी

३१.४ टक्‍क्‍यांची तूट

१ जून ते १२ जुलै या कालावधीत राज्‍यात सरासरी ५२.०५ इंच इतक्‍या पावसाची नोंद होत असते. यंदा मात्र याच काळात केवळ ३५.७२ इंच पाऊस पडला आहे. त्यामुळे या कालावधीत सरासरी पावसात ३१.०४ टक्‍के इतकी तूट असल्‍याचे दिसून येते.

पुढील पाच-सहा दिवसांत पाऊस न पडल्‍यास ज्‍या भागांतील भातशेतीला नद्या-ओहोळांतून पाणी मिळते, अशा शेतीला कोणताही फटका बसणार नाही. परंतु, ज्‍या भागांतील भातशेती केवळ पावसाच्‍या पाण्‍यावर अवलंबून आहे, अशा शेतीला मात्र फटका बसू शकतो. - चंद्रहास देसाई, कृषी संचालक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com