Goa Assembly Monsoon Session 2026: सप्‍टेंबरपूर्वी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन, सभापतींनी दिली मोठी अपडेट; हालचालींना वेग

Goa Assembly Monsoon Session Timeline: ‘विधानसभेचे गत अधिवेशन मार्चमध्‍ये झालेले होते. कायद्यानुसार एका अधिवेशनानंतर सहा महिन्‍यांत दुसरे अधिवेशन घेणे महत्त्‍वाचे आहे.
Goa Assembly Monsoon Session 2026
speaker ganesh gaonkar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन कधी बोलवायचे? हा सर्वस्‍वी सरकारचा निर्णय असतो; परंतु पावसाळी अधिवेशन सप्‍टेंबरपूर्वी होईल, असे सभापती गणेश गावकर यांनी बुधवारी (ता.१७) पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले. ‘विधानसभेचे गत अधिवेशन मार्चमध्‍ये झालेले होते. कायद्यानुसार एका अधिवेशनानंतर सहा महिन्‍यांत दुसरे अधिवेशन घेणे महत्त्‍वाचे आहे. त्‍यामुळे पावसाळी अधिवेशन सप्‍टेंबरपूर्वी बोलावण्‍यात येईल’, असे गावकर म्‍हणाले.

दरम्‍यान, विधानसभेचे मार्चमध्‍ये झालेले अर्थसंकल्‍पीय अधिवेशन ६ ते २७ मार्च या कालावधीत १४ दिवसांसाठी बोलावण्‍यात आले होते. दरम्यान, आता पावसाळी अधिवेशन सप्‍टेंबरआधी होणार असल्‍याचे सभापती गावकर यांनी स्‍पष्‍ट केल्‍याने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. विविध प्रलंबित प्रश्न, विकासकामे, जनहिताचे मुद्दे व सरकारी धोरणांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी करत आहेत.

Goa Assembly Monsoon Session 2026
Goa CM Pramod Sawant: सोने खरेदीवर संयम ठेवा! लोकांनी पंतप्रधान मोदींचे आवाहन गांभीर्याने घ्यावे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

‘तो’ अधिकार सर्वस्‍वी सरकारला!

मुख्‍यमंत्री सावंत कायम कायद्याला धरूनच चालतात. शिवाय अधिवेशन बोलावण्‍याचा आणि ते किती दिवस घ्‍यायचे? हे ठरवण्‍याचा अधिकार सर्वस्‍वी सरकारला असतो. त्‍यानुसार मुख्‍यमंत्री डॉ. सावंत सप्‍टेंबरपूर्वी अधिवेशन बोलावतील आणि आमदारांना आपापल्‍या मतदारसंघांतील प्रश्‍‍न मांडण्‍याची संधी देतील, असा विश्‍‍वास सभापती गणेश गावकर यांनी व्‍यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Government Development Exhibition
Goa Monsoon Farming
Panaji Market
Goa Monsoon Preparedness
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com