Goa Opposition Unity: 3 दिवसांच्या अधिवेशनावरून विरोधक आक्रमक! विजय सरदेसाई-गिरीश चोडणकर चर्चेनंतरही ऐक्यावर प्रश्नचिन्ह

Goa Assembly Session 2026: अधिवेशन बैठकीच्‍या निरोपावरून युरी-विजयमध्‍ये आरोप-प्रत्‍यारोप, आघाडीवरून चोडणकरांनी ‘आप’ला सुनावले, वाल्‍मिकीकडूनही प्रत्‍युत्तर
Goa Assembly Session 2026
Goa Opposition UnityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अधिवेशन बैठकीच्‍या निरोपावरून युरी-विजयमध्‍ये आरोप-प्रत्‍यारोप, आघाडीवरून चोडणकरांनी ‘आप’ला सुनावले, वाल्‍मिकीकडूनही प्रत्‍युत्तर, ‘गोवा फॉरवर्ड’चे विजय सरदेसाई व काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांच्यातील बैठकीत आघाडीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असली तरी अद्याप विरोधी ऐक्याच्या केवळ वल्गनाच आहेत.

सोमवारी विरोधी आमदारांच्या बैठकीचा साधा निरोप देण्यावरून झालेला वाद तसेच काँग्रेस, ‘आप’कडून प्रसार माध्यमांतून एकमेकांना निरोप देण्याच्या पद्धतीवरून विरोधकांमध्‍ये अविश्‍‍वासाचे वातावरण असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. उपरोक्‍त घडामोडी पाहता विधानसभेच्या ३१ ऑगस्‍टपासून होणाऱ्या अधिवेशनात विरोधी ऐक्याचे दर्शन घडणार का, असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे.

Goa Assembly Session 2026
Gen Z Social Media Politics: 'जेन-झी' पिढीने कसा बदलला राजकीय विरोधाचा पॅटर्न?

विधानसभा संकुलातील विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात काही विरोधी आमदारांची आज बैठक झाली. अधिवेशन कालावधी वाढवण्याची मागणी सभापती गणेश गावकर यांची भेट घेऊन करण्याचे ठरवण्यात आले. आमदार ॲड्. कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा, वेन्झी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, वीरेश बोरकर यावेळी उपस्थित होते.

बैठकीनंतर युरी म्हणाले, अधिवेशन अवघ्या तीन दिवसांचे असल्याने सखोल चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. पहिल्या दिवशी २५, दुसऱ्या दिवशी २२ व तिसऱ्या दिवशी ३६ अशा ८३ अनुदान मागण्या सभागृहासमोर येणार आहेत. त्‍यावर मर्यादित वेळेत चर्चा करणे व्यवहार्य नसल्याने लोकहिताच्या प्रश्नांवर अन्याय होईल.

Goa Assembly Session 2026
Goa Politics Satire: गोव्याच्या अधिवेशनाची राजकीय 'आकडेमोड'!

युरी म्‍हणतात, मेसेज केला!

विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात सोमवारी सायं. ४.३० वाजता बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍या संदर्भात सरदेसाई यांना ‘व्हॉटसॲप’च्या माध्यमातून आपण २ ऑगस्‍टला रात्री संदेश पाठवला होता, असा दावा युरी आलेमाव यांनी मोबाईल दाखवत केला. असा संदेश विजय सरदेसाई यांच्यासह ‘आप’चे आमदार, अपक्ष आमदार आणि इतर विरोधी सदस्यांनाही पाठविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

मी काही वैमानिक नाही : विजय

आमंत्रणाच्‍या मुद्यावर सरदेसाई यांनी तीव्र नाराजी व्‍यक्‍त करत युरी यांचा दावा फोल असल्‍याचे म्‍हटले आहे. विजय सरदेसाई यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना म्‍हटले आहे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा केवळ एक मिस्ड कॉल आला होता. ‘मी काही वैमानिक नाही आणि माझ्याकडे विमानही नाही की इतक्या अल्प सूचनेवर तात्काळ बैठकीच्या ठिकाणी पोहोचू शकेन’.

Goa Assembly Session 2026
Goa Politics: युतीच्या चर्चेला मुहूर्त, विजय-गिरीश यांची मडगावात भेट; जागावाटपावर मात्र 'ब्र'ही नाही

‘आप’ने भूमिका स्‍पष्‍ट करावी

विरोधकांची व्यापक आघाडी उभारण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू असताना, ‘आप’ने भूमिकेबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी समाजमाध्‍यमांवरून केली. गोव्यातील ‘आप’ नेते काँग्रेससोबत आघाडी करण्यास उत्सुकता दाखवत असताना राष्ट्रीय नेतृत्व काँग्रेसवर टीका करत आहे. आपण आपचे नेते वाल्मिकी नाईक यांच्याशी चर्चा केली असून, आघाडी नको असल्यास तसे स्पष्टपणे जाहीर करावे, असे सांगितल्याचे चोडणकर म्हणाले.

नाहक वातावरण बिघडवू नका

आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईकही समाजमाध्‍यमांवर व्‍यक्‍त झाले. गिरीश चोडणकर यांना वातावरण बिघडवणारी सार्वजनिक विधाने टाळण्याचे त्‍यांनी आवाहन केले. यावेळी त्‍यांनी काँग्रेसचे नेतेही ‘आप’वर टीका करत असल्‍याचा दावा केला. पंजाबात आप-काँग्रेस विरोधात लढत आहे. तथापि, भाजपविरोधात सक्षम पर्याय उभा करण्यासाठी विरोधी पक्षांनी परस्परांवर टीका करण्याऐवजी एकत्र येण्याच्या प्रक्रियेला चालना देणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com