Goa Politics: 'मगोपमध्ये जाणार काय'? आजगावकर म्हणाले 'मग पाहू'; ढवळीकरांना अजूनही नेता मानत असल्याचे दिले उत्तर

Babu Ajgaonkar: माजी मुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी रविवारी मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांच्यासमोरच गुगली टाकली.
Babu Ajgaonkar
Babu AjgaonkarX
Published on
Updated on

पणजी: पेडणे मतदारसंघातून आपण आगामी निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार करणाऱ्या माजी मुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी रविवारी मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांच्यासमोरच गुगली टाकली. त्यांनी आपल्याला भाजपने उमेदवारी दिली नाही तरी त्या-त्यावेळी निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

बाबू कला अकादमीच्या बाहेर आवारात वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याबरोबर चर्चा करताना दिसले. या वेळी पत्रकारांनी गुपित काय असे विचारले, तेव्हा आजगावकरांनी सुदिन हे आपले लीडर (नेता) आहेत आणि आपण त्यांना लीडर मानतो. तुम्ही मगोपमध्ये जाणार काय, असे विचारताच ते मग पाहू असे सांगत आजगावकरांनी हसत उत्तर दिले.

Babu Ajgaonkar
Goa Politics: खरी कुजबुज; पोलिस यंत्रणा दबावाखाली

आम्ही सकारात्मक!

मगोप पक्ष पुढे नेणारा नेता म्हणजे सुदिन ढवळीकर, हे आपण विसरू शकत नाही. त्यामुळेच हा पक्ष अजूनही टिकून आहे. आपले संबंध सगळ्यांकडे आहेत, राजकारणात कोणी दुश्मन नसतो, सर्वांना घेऊन पुढे जायचे असते.

Babu Ajgaonkar
Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

आमचे संबंध मित्रत्वाच्या नात्याने आहेत, असे आजगावकरांनी सांगताच त्यावर ढवळीकरांनीही तेच शब्द उच्चारले. त्यावरून पत्रकारांनी प्रश्न बाबूला केल्यास उत्तर ढवळीकर देतात, यावर आजगावकर यांनी ‘तसे काय नाय रे’ असे म्हणत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. आम्ही सकारात्मक आहोत, असे सांगत दोघांनीही तेथून पाय काढता घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com