Goa: भूमिपुत्रच समस्या सोडवू शकतो - राजन कोरगावकर

मिशन फॉर लोकल चे कार्य सध्या चालू असून राखीव मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, त्यासाठी मागच्या सहा महिन्यांपासून मिशन फॉर लोकलने कार्य सुरु केले आहे (Goa)
Goa
GoaDainik Gomantak

मोरजी: स्थानिक अर्थात भूमिपुत्र आणि तोही पेडणे तालुक्यातील असेल तर त्याला स्थानिकांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि तोच च योग्यरीत्या त्या सोडवू शकेल , आपण पेडणेकर म्हणून आपल्याला एक संधी सामाजिक कार्य करण्याची पेडणेकर नक्कीच देतील असा विश्वास मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी हणखणे येथील धनगर वाड्यावरील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर व्यक्त केला आहे. यावेळी स्थानिक युवकांनी राजन कोरगावकर याना आपला पूर्ण पाठींबा दिला .

मिशन फॉर लोकल चे कार्य सध्या चालू असून राखीव मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, त्यासाठी मागच्या सहा महिन्यांपासून मिशन फॉर लोकलने कार्य सुरु केले आहे . पेडणे मतदार संघातील प्रत्येक पंचायत क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्ये नागरिक आणि स्थानिकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आज धनगर वाड्यावर एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी धनगर समाजातील नागरिकानी आपल्या समस्याही मांडल्या आहेत .

Goa
Goa: आरोग्य केंद्र ते पोलीस स्थानकासमोरील रस्त्याची "दलदली"तून मुक्तता होणार

या समस्या ऐकताना राजन कोरगावकर यांनी आपण कुणालाच केवळ आश्वासन देणार नाही तर कृती केल्यानंतर बोलणार असे सांगितले. नागरिकांनी यावेळी आपल्या समस्या मांडताना या मतदार संघातून आतापर्यंत आमदार निवडून आले मात्र आमच्या गरिबांच्या समस्यांकडे कुणी लक्षच दिले नाही , खासदाराने तर हा गाव दत्तक घेतला होता आदर्श गाव करण्यासाठी मात्र आजपर्यत आदर्श गाव झाला की नाही हे आम्हालाच माहित नाही परंतु आमच्या परिसराचा कोणताच विकास झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.तसेच उच्च शिक्षण घेवून युवक बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी कुणीच काही केले नाही. बेरोजगारीने युवक त्रस्त असल्याचे मत मांडले . बेरोजगारी आणि आमच्या मांडलेल्या समस्या जर सोडवत असाल तर आमचा पूर्ण पाठींबा राहील असे युवकांनी कोरगावकर यांना ग्वाही दिली आहे .

राजन कोरगावकर यांनी यावेळी बोलताना आपण राजकारणी नव्हे राजकारण करण्यासाठी आलो असतो तर मागच्या चार वर्षापासून आलो असतो, आपण केवळ भूमिपुत्र आहे,आपल्याला समाजकारण करायचे आहे आपण भूमिपुत्र आहे त्यामुळे पेडणेकरांच्या काय समस्या आहे याची जाणीव आपल्याला आहे तसेच एका भूमिपुत्राला जर स्थानिक साथ देत असतील तरच आपण राजकारणात उतरणार असून आपण कोणतेही कार्य करत असताना आपल्याला त्यातून किती लाभ होईल हे पाहत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे .

Goa
Goa: डेल्टा प्लस चाचणीसाठी प्रयोग शाळा त्वरित स्थापन करावी

कोरगाव माजी सरपंच राजू नर्से यांनी यावेळी बोलताना आतापर्यंत निवडून आलेल्या आमदार मंत्र्यांनी हा मतदार संघ विकासापासून वंचित ठेवला आहे, आज काही भागात अजून रस्ते वीज पोचलेली नाही, उपमुख्यमंत्री केवळ भाषणे करतो की आपण गावागावात रस्ते वीज पोहोचवली, तर मग आजपर्यंत धनगर वाड्यावर रस्ता का पोहोचला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे . तसेच भूमिपुत्रांना येत्या निवडणुकीत आपण संधी देवू असे आवाहनही त्यांनी स्थानिकांना केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com