Goa: डेल्टा प्लस चाचणीसाठी प्रयोग शाळा त्वरित स्थापन करावी

अन्यथा कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे. डेल्टा प्लस शेजारच्या कोकणात, कर्नाटक आणि केरळमध्ये आधीच पोहोचला आहे.
डेल्टा प्लस व्हेरियेंटचे विषाणू तपासण्यासाठी  व जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी  प्रयोग शाळा त्वरित स्थापन करावी गिरीश  चोडणकरांची मागणी.
डेल्टा प्लस व्हेरियेंटचे विषाणू तपासण्यासाठी व जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी प्रयोग शाळा त्वरित स्थापन करावी गिरीश चोडणकरांची मागणी. Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: डेल्टा प्लस (Delta Plus) व्हेरियेंटचे विषाणू तपासण्यासाठी व जीनोम सिक्वेन्सिंग (Genome sequencing) चाचणीसाठी प्रयोग शाळा (laboratory) त्वरित स्थापन करावी. नाहीतर कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Congress President Girish Chodankar) यांनी आज जारी केलेल्या पत्रकातून दिला आहे.

इतर राज्यातून गोव्यात प्रवेश करणाऱ्या लोकांची फक्त ॲन्टीजन चाचणी करुन भाजप सरकार राज्यातील लोकांचे आयुष्य धोक्यात आणत आहे. डेल्टा प्लस शेजारच्या कोकणात, कर्नाटक आणि केरळमध्ये आधीच पोहोचला आहे.

डेल्टा प्लस व्हेरियेंटचे विषाणू तपासण्यासाठी  व जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी  प्रयोग शाळा त्वरित स्थापन करावी गिरीश  चोडणकरांची मागणी.
गोव्यात मतदार भाजपवर नाराज नाही: सी. टी. रवी

हा विषाणू फक्त जीनोम सिक्वेन्सिंग द्वारे ओळखायला मिळतो. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील बेजबाबदार भाजपा सरकारने गोव्यात जीनोम चाचणी सुविधा सुरू करण्यासाठी त्वरित पावले उचलली पाहिजेत. अशी मागणी करून कोविडच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे भाजपा सरकारने कोविड रुग्णांची हत्या केली . असा आरोप चोडणकर यांनी केला आहे. असंवेदनशील आणि भ्रष्ट भाजप सरकार कमिशनचा वाटा ठरविण्यात व्यस्त राहिले, ज्यामुळे ३ हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com