डिचोली: डिचोली (bicholim) सामाजिक आरोग्य केंद्रासह (Health Center) पोलीस ठाणे (Police Station ) आणि शेतकरी कार्यालयाची आता "दलदली"तून (swamps) मुक्तता होण्याची आशा निर्माण झाली आहे. दलदलीस कारण ठरणारा आणि मागील बरीच वर्षे दुर्लक्षित राहिलेले आरोग्य केंद्र ते पोलिस स्थानकासमोरील मुख्य रस्त्याच्या बाजूचे गटार उपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे गटार उपासण्याकडे दुर्लक्ष झाल्याने मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात हे गटार तुंबून एका रांगेत असलेल्या आरोग्य केंद्रासह पोलिस स्थानक आणि शेतकी कार्यालयाच्या इमारतीसमोर दलदल आणि चिखलाचे साम्राज्य पसरते. यंदाही हीच समस्या निर्माण झाली आहे.
यामुळे आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांसह पोलिस स्थानक आणि कृषी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यापुर्वी दै. 'गोमन्तक' मधून या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र आतापर्यंत या समस्येकडे दुर्लक्ष होत होते. डिचोली शहराला जोडून असलेला हा परिसर कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने स्थानिक सरपंच गोकुळदास सावंत यांनी पुढाकार घेवून गटार उपसण्याचे काम हाती घेतले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.