Goa: जागरूक, सतर्क राहाल तरच टिकाल

राजकारण्यांच्या अपप्रचाराला पेडणेकर सहजपणे बळी पडतात.
नवचेतना युवक संघ पेडणे व मराठी विभाग संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयातर्फे आयोजित चर्चासत्र
नवचेतना युवक संघ पेडणे व मराठी विभाग संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयातर्फे आयोजित चर्चासत्रDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: गोवा मुक्तीचा हीरक महोत्सव (Festival) साजरा करत असताना राज्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी युवा पिढीला नेहमी जागरूक आणि सतर्क राहावे लागेल तरच त्यांचा निभाव लागेल, असा संदेश पत्रकार किशोर नाईक गांवकर यांनी दिला. राज्यासमोर विकासासंबंधी सरकारने (politics) युवकांशी साधकबाधक चर्चा करण्याची गरज आहे,असेही ते म्हणाले.

युवा पिढी हेच देशाचे भवितव्य (future of country) आहे. या युवा पिढीने स्वप्ने जरूर पाहावीत पण त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती नेमके काय चालले आहे, याकडेही लक्ष द्यावे. राजकारणापासून अलिप्त कुणीच राहु शकत नाही. आपल्या जगण्या मरण्याशी राजकारण निगडीत आहे आणि त्यामुळे राजकारणात रस घेऊन योग्य लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा,असेही नाईक गांवकर यांनी सांगितले.आदर्श देशाची सुरूवात ही गावांतील पंचसदस्य निवडीपासून सुरू व्हायला हवी.

नवचेतना युवक संघ पेडणे व मराठी विभाग संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयातर्फे आयोजित चर्चासत्र
'वडिलांचे पितृछत्र' हरवलेल्या मोरजी येथील विजया शेटगावकरची कहाणी..

आदर्श पंच निवडला तर आपोआप आदर्श सरपंच घडेल, आदर्श आमदार निवडलात तरच आदर्श मुख्यमंत्री (CM ) मिळेल आणि आदर्श खासदार निवडलात तरच आदर्श पंतप्रधान मिळेल. लोकप्रतिनिधींची निवड करताना त्यांचे शिक्षण, ज्ञान आणि मतदारसंघाबरोबरच राज्य आणि देशासमोरील आव्हानांचे त्यांना किती भान आहे, हे ओळखूनच मतदान करण्याची गरज आहे,असेही यावेळी नाईक गांवकर म्हणाले. शैक्षणिक संस्था अशा चर्चासत्रांचे मुख्य केंद्र बनावे जेणेकरून युवा पिढी जागरूक आणि सजग होण्यात मदत होईल,असे मत त्यांनी व्यक्त केले.

पेडणेतील वेगवेगळ्या विकास प्रकल्पासंबंधी उपस्थितांनी आपले विचार मांडले. मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ, आयआरबी बटालीयन, कॅसिनो सिटी आदी प्रकल्पांमुळे पेडणेची समाजरचनाच बदलून जाईल आणि मुळ पेडणेकर गायब होईल,असे माजी नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू म्हणाले. पेडणेत आणि राज्यातही या प्रकल्पांसाठीचे कुशल मनुष्यबळ नसल्याने स्थलांतरीतांचे लोंढे वाढतील,असेही त्यांनी सांगितले. पत्रकार प्रकाश तळवणेकर यांनी एकंदरीत पेडणेच्या अविचारी विकास प्रकल्प संकल्पनांनी पेडणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले.

राजकारण्यांच्या अपप्रचाराला पेडणेकर सहजपणे बळी पडतात,असेही ते म्हणाले. उदय महाले यांनी मोपा विमानतळ प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची झालेली फसवणूक कथन केली. भरत बागकर यांनी मोपा लिंक रोड प्रकल्पामुळे शेतकरी कसे उध्वस्त झाले, याची माहिती दिली आणि युवकांनी जागे होऊन आता पेडणे आणि राज्याच्या रक्षणासाठी सज्ज व्हावे,असे आवाहन केले. पत्रकार महादेव गवंडी यांनीही पेडणे तसेच राज्यासमोरीलह वेगवेगळ्या विषयांबाबत युवकांकडे चर्चा होण्याची गरज व्यक्त केली.

नवचेतना युवक संघ पेडणे व मराठी विभाग संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयातर्फे आयोजित चर्चासत्र
मोरजी टेंबवाडामधील पाण्याच्या समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच!

प्रारंभी सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य फिलीप रोड्रीग्ज इमेलो यांनी स्वागत केले. नवचेतनाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी प्रास्ताविक केले. युवा उद्योजक विराज हरमलकर यांनीही आपले विचार मांडले. शिक्षिका श्रद्धा धोंड यांनी पाहुण्यांचा परिचय केला. प्रशाली माने,सूरज शेट्ये,शिवम पार्सेकर यांनी पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले. साहील नारूलकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.मराठी विभाग प्रमुख डॉ. निता तोरणे यांनी आभार मानले.

नवचेतना युवक संघ आणि मराठी विभाग संत सोहीरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्याचा हीरक महोत्सव आणि युवकांची भूमिका या विषयावरील चर्चासत्राला संबोधीत करताना किशोर नाईक गांवकर बोलत होते. यावेळी संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फिलीप रोड्रिगज ईमेलो, युवा उद्योजक तथा समाजसेवक विराज हरमलकर, मराठी विभाग प्रमुख डॉ.नीता तोरणे, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, प्रा.आनंद कोलंबकर,प्रा.श्रद्धा धोंड,प्रा.अंजली नाईक,प्रा.सचिन वेटे,ओंकार गोवेकर,गौरेश पेडणेकर, जगदीश भिवजी,समाजसेवक मनोहर तळवणेकर,प्रयण धामसकर,जितेंद्र गावकर,बाया वरक, संदीप कांबळी,नारायणv गडेकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com