पाळी (Goa News): पाळी पंचायतीच्या नूतन इमारत प्रकल्प उभारण्यासाठी कार्यवाही केली आहे. तळेमाथा येथे वीज खात्याच्या संकुलाजवळ जागा आरक्षित केली आहे. या कामासाठी 2016 मध्ये 3 कोटीची तरतूद करून ठेवली आहे. फक्त विद्यमान पंचायत मंडळाने त्यासाठी निर्णय घ्यायचा आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Swant) यांनी दिली.
पाळी येथील नवदुर्गा देवस्थानतर्फे या भागाचे आमदार तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सत्कार सोहळा आज (रविवारी) आयोजित करण्यात आला होता.
सत्कारानंतर मुख्यमंत्र्यांनी पाळी गावच्या विकासाबाबत भविष्यातील तरतूदीबाबत माहिती दिली. यावेळी हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, देवस्थानचे पुजारी विष्णू भावे. शुभदा भावे, सुलक्षणा सावंत तसेच देवस्थानचे अध्यक्ष विष्णू गावस आदी उपस्थित होते.
राज्यपाल आर्लेकर म्हणाले, कार्यकर्त्यांची ओळख करून देण्याची गरज नसते. आता जरी गोव्याचे मुख्यमंत्री या सर्वोच्चपदी प्रमोद सावंत असले तरी भारतीय जनता पक्षाचे कार्य विस्तारण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे नमूद केले. प्रमोद सावंत यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने समाजकार्य करताना साखळी मतदारसंघाची विकासकामे केली त्याला तोड नसल्याचे सांगून कोविड महामारी पूर्णतः दूर करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे काम करावे, असे आवाहन केले.
यावेळी राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते प्रमोद सावंत यांचा तर प्रमोद सावंत यांच्या हस्ते गेली सात दशके देवीची सेवा करणारे विष्णू भावे यांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक विष्णू गावस यांनी केले. शाम गावस यांनी सत्कार मूर्तींची ओळख करून दिली. अॅड रघुवीर वर्दे यांनी सूत्रसंचालन केले. किशोर भावे यांनी आभार मानले.
निष्ठेने काम करा, यश हमखास!
समाजकारणातून आपण राजकारणात आलो. समाजाची सेवा करण्यासाठी आपले मातापिता तसेच ज्येष्ठांचा आशीर्वाद आपल्याला लाभला त्यामुळेच आमदार या नात्याने साखळी मतदारसंघ आणि मुख्यमंत्री या नात्याने राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करू शकलो. एखादे काम निष्ठेने केले तर यश हमखास मिळू शकते हे आज युवकांनी ध्यानी धरायला हवे असे ते म्हणाले. सर्वांचे सहकार्य आणि प्रेमामुळेच तसेच देवतांच्या कृपेमुळेच हे साध्य झाले असे सांगून सर्वांचे प्रेम व आशीर्वाद अबाधित राहू दे, अशी मनिषा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
देशाचे अखंडत्व कायम राहू दे!
हा देश माझा आहे. या देशाचे अखंडत्व कायम राहूदे ही भावना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी बाळगली पाहिजे. या भावनेमुळेच आज भाजप पक्ष देशाचे नेतृत्व करू शकला. निस्वार्थ कार्यकर्त्यांमधूनच नेतृत्व निर्माण होते, असे मार्गदर्शन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी कार्यकर्त्यांना केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.