भाजपकडून जनतेची फसवणूक..!

दिनेश गुंडूराव : काँग्रेसतर्फे थिवीत ‘म्हारगायेचों जागर’
Goa Politics :  CM Dr Pramod Sawant
Goa Politics : CM Dr Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा (Mapusa) : भाजपाकडून (BJP) जनतेला मोठी फसवणूक झाली आहे. (Goa Politics) खोटी आश्वासने देऊन भाजपने गोरगरीब, शेतकरी, छोटे-मोठे व्यवसायिक अशा सर्वच समाजघटकांना वेठीस धरलेले आहे, अशी टीका काँग्रेसचे (Congress) गोवा (Goa) विभागप्रमुख दिनेश गुंडूराव यांनी केली.

काँग्रेसतर्फे थिवी मतदारसंघात आयोजित केलेल्या ‘म्हारगायेचो जागर’ अभियानावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, की भाजप सरकारच्या काळात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

Goa Politics :  CM Dr Pramod Sawant
मुख्यमंत्री सावंत यांनी माफी मागावी..!

लोकांचे आर्थिक उत्पन्न मात्र वाढलेले नाही. उलट काहींचे नोकरी-व्यवसायही गेले. कोट्यवधींच्या संख्येने नोकऱ्या उपलब्ध करून देण्याच्या स्वत:च्या आश्वासनालाही त्यांनी हरताळ फासलेला आहे. लोक आता महागाईबाबत पोटतिकडीने भाजपविरोधात बोलत आहेत, हे आम्हाला घरोघरी महागाईविरोधी पत्रके वितरित करताना प्रकर्षाने जाणवले.

यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संगीता परब, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके, मतदारसंघातील काँग्रेसचे नेते उदय साळकर, थिवी गट काँग्रेसचे अध्यक्ष उमाकांत कुडणेकर, महिला गट अध्यक्ष पूजा वारखणकर, थिवीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंचायतसदस्य शिवदास कांबळी उपस्थित होते.

Goa Politics :  CM Dr Pramod Sawant
गोव्यात तृणमूलच्या येण्याने भाजपलाच फायदा

सध्या महागाई व भ्रष्टाचारामुळे भाजप सरकार जाण्याचे दिवस समीप येत आहेत. काँग्रेस हा गोरगरिबांसाठी आवश्यक योजना राबवणारा पक्ष आहे व हाच पक्ष सत्तेवर येणे ही काळाची गरज आहे. महागाईविरोधातील आमच्या अभियानास लोक मनापासून प्रतिसाद देत आहेत.

- संगीता परब, माजी शिक्षणमंत्री

भाजपमुळे आज महागाई एवढी वाढली आहे, की गरीब लोक अक्षरश: होरपळून गेले आहेत. आमदार हळर्णकर यांनी पक्षांतर करून थिवी मतदारसंघातील लोकांची घोर फसवणूक केली असल्याने येत्या निवडणुकीत मतदारांनी त्यांचा पराभव करून त्यांना कायमचे घरीच बसवावे.

- उदय साळकर, काँग्रेस नेता

थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर यांनी स्वार्थासाठी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला याबाबत त्यांना धडा शिकवण्याची नामी संधी मतदारांना आता निवडणुकीच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. गोव्याच्या अस्मितेच्या रक्षणासाठी काँग्रेसशिवाय आता पर्यायच नाही.

- विजय भिके, उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com