ड्रग डेस्टिनेशन ठरलेल्या गोव्यासाठी NCB ची जबाबदारी वाढली; महाराष्ट्र, कर्नाटकातील 2 जिल्ह्यांचा झोनमध्ये समावेश

गोव्यात मागील दोन वर्षात अमली पदार्थ प्रकरणी 21 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 47 जणांना अटक करण्यात आली.
Goa NCB
Goa NCBDainik Gomantak
Published on
Updated on

Goa NCB And Drug Crackdown: गोव्यात मागील दोन वर्षात अमली पदार्थ प्रकरणी 21 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 47 जणांना अटक करण्यात आली. यात 34 भारतीय आहेत तर उर्वरीत आंतरराष्ट्रीय संशयित आहेत.

गृह मंत्रालयाने याची दखल घेऊन गोव्यातील अमली पदार्थ नियंत्रण संस्था (NCB) कार्यालयाचे उप-क्षेत्रातून विभागीय क्षेत्रात रुपांतर केले आहे.

"गोवा विभागात आता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. मर्यादीत कर्मचाऱ्यांसह अमली पदार्थ विरोधी पथकाची जबाबदारी वाढणार आहे," असे NCB च्या एका कर्मचाऱ्याने गोमन्तकला सांगितले.

2021 साली सात नायजेरियनसह कॉन्गो, स्वीस आणि दक्षिण आफ्रिकेच्या संशयितांना अटक करण्यात आली. 2022-23 साली चार रशियन, एक गिनी, एक ब्रिटीश, एक नाजेरिया आणि केनिया येथील संशयितांवर कारवाई करण्यात आली. यातील दोघांना एक किलो ग्रॅमपेक्षा अधिक कोकेनसह अटक करण्यात आली.

गोव्याकडे ड्रग डेस्टिनेशन म्हणून पाहिलं जातं की नाही मला माहिती नाही पण, गोव्यात येणारे अमली पदार्थ विक्रीसाठी पर्यटकांना लक्ष्य केले जाते, आणि प्रत्येकवेळी त्यांचे ग्राहक वेगळे असतात त्यामुळे कारवाई करणे कठीण होते, असे NCB चे वरिष्ठ अधिकारी म्हणाले.

Goa NCB
नुवेतील नवज्योती पुनर्वसन केंद्र! लैंगिक शोषणचा बळी व वेश्याव्यवसायात गुरफटलेल्या महिलांचे हक्काचे घर

2021 पासून NCB कारवाईची आकडेवारी पाहता ती गांजा आणि चरसपासून रासायनिक ड्रग्सकडे वळताना दिसत आहे. 2023 मध्ये कोकेन साठा सर्वाधिक 1017.8 ग्रॅम होता.

मेटाम्फेटामाइन, अॅम्फेटामाइन, एमडीएमए, मेफेड्रोन, एलएसडी, सायलोसायबिन हे नवीन अमली पदार्थ हळूहळू चरस आणि गांजाची जागा घेत असून, एनसीबीचे अधिकारी देखील त्याच पद्धतीने ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

NCB 'अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीला प्रतिबंध आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1988' (PITNDPS Act of 1988) अंतर्गत कारवाई करते.

कोलवाळ कारागृहात याप्रकरणी एका नायजेरियन विरोधात या कायद्याअंतर्गत कारवाई केली त्यानंतर पोलिसांनी एका स्थानिकाविरोधात याच कायद्याखाली कारवाई केली.

- उप-खंड (i) ते (iii) व्यतिरिक्त अमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थ संबधित घटनेत सामिल असणे

- अशा गोष्टींसाठी जागा देणे किंवा त्यासाठी परवानगी देणे

- प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने अशा कामासाठी आर्थिक सहाय्य देणे

- अशा कामांसाठी कट रचणे किंवा मदत करणे

- अशा कामात गुंतलेल्या व्यक्तीला सहकार्य किंवा प्रोत्साहन देणे

Goa NCB
Drug Nexus In Goa: संगीत पार्ट्या अमली पदार्थ तस्करीचे तळ; पोलिसांचे अभय, गोव्यासाठी धोक्याचा इशारा

2008 च्या बॅचचे IRS अधिकारी अमित घावटे NCB गोवा झोनचे कामकाज पाहतात. त्यांच्या टीमने अमली पदार्थ विक्रीत गुंतलेल्या संशयितांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

"एनडीपीएस कायदा फक्त ड्रग्ज विकणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी नाही तर विविध तरतुदींद्वारे डीलर्सला हतबल करण्याचा देखील पर्याय आहे. त्यापैकी एक म्हणजे ड्रग्स विक्रीत असलेल्या संशयितांची मालमत्ता गोठवणे हा एक मार्ग आहे," असे एका एनसीबी अधिकाऱ्याने सांगितले.

“आम्हाला मुंबईतील सक्षम प्राधिकरणाकडून 2022 मध्ये हणजुणे येथील रॉकी फर्नांडिसची मालमत्ता गोठवण्याचा आदेश मिळाला होता. NDPS कायद्याचे प्रकरण 5(a) आम्हाला संबंधित पुराव्यासह सहा वर्षांच्या कालावधीत संपादन केलेली मालमत्ता गोठवण्याची परवानगी देते,” असे अधिकारी म्हणाले.

"2022 मध्ये गोवा NCB युनिटने, प्रथमच अमली पदार्थ विल्हेवाट लावण्याची प्रणाली सादर केली, नंतर स्थानिक पोलिसांनी देखील त्याचे अनुसरण केले," असे NCB अधिकाऱ्याने सांगितले.

“राज्य पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथका (ANC) सोबत काम करणे हे एनसीबीचे उद्दिष्ट आहे. आम्ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करतो आणि इतरांनी त्याचे पालन करावे किंवा सुधारावे अशी अपेक्षा. पण अमली पदार्थाला बळी पडणाऱ्यांचा बचाव करणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे,” असे एक अधिकारी म्हणाले.

गोव्याची ड्रग डेस्टिनेशन ओळख निर्माण केली जात आहे. सरकारने विचार केल्यास हे थांबविण्यासाठी त्याला NCB हे उत्तर असू शकते आणि गोवा याची वाट पाहत आहे.

- अगस्तो रॉड्रिग्ज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com