नुवेतील नवज्योती पुनर्वसन केंद्र! लैंगिक शोषणचा बळी व वेश्याव्यवसायात गुरफटलेल्या महिलांचे हक्काचे घर

वेश्याव्यवसायातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या लैंगिक शोषणग्रस्त महिलांना नुवे येथील नवज्योती पुनर्वसन केंद्रात हक्काचा आसरा मिळतो.
Navajyothi Rehabilitation centre Nuvem, Goa
Navajyothi Rehabilitation centre Nuvem, Goa
Published on
Updated on

Navajyothi Rehabilitation centre Nuvem, Goa: जगात कुठेही गेले तरी खुल्या किंवा छुप्या पद्धतीने चालणारा वेश्याव्यवसाय पाहायला मिळतो. गोव्यात देखील ऐकेकाळी बायणा, वास्को येथे वेश्याव्यवसाय चालायचा पण, ही वस्ती हटविण्यात आली.

वस्ती हटवली तरी राज्यात या ना त्या मार्गाने वेश्याव्यवसाय सुरुच आहे. याचा पुरावा अधूनमधून समोर येणाऱ्या बातम्यांमधून मिळतो.

वेश्याव्यवसायातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या लैंगिक शोषणग्रस्त महिलांना नुवे येथील नवज्योती पुनर्वसन केंद्रात हक्काचा आसरा मिळतो. मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या दोनशेहून अधिक महिलांची येथून नव्या आयुष्याला सुरुवात झाली.

'वेश्याव्यवसायातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या सर्व लैंगिक शोषणग्रस्त महिलांना मदत करणे आमचे ध्येय असून, हे काम कधीही थांबणार नाही,' असे नुवे येथील मार्गीली कोम्पन यांनी म्हटले आहे.

पैसा कमविण्याचा सर्वात सोपा मार्ग आणि कोणीही मार्गदर्शन करण्यासाठी नसल्याने अनेक स्त्रिया वेश्याव्यवसायाकडे वळतात.

काही स्त्रियांसाठी पुरुषाशी संपर्क अटळ असतो आणि शिवाय यातून निर्माण होणाऱ्या भावना वेगळी अनुभूती देणाऱ्या असतात. हा सर्व प्रकार अनैसर्गिक पद्धतीने होत जातो आणि चूक लक्षात येईपर्यंत त्याचे अनेकजण त्याच्या आहारी गेलेले असतात, असे कोम्पन यांनी म्हणतात.

Navajyothi Rehabilitation centre Nuvem, Goa
Drug Nexus In Goa: संगीत पार्ट्या अमली पदार्थ तस्करीचे तळ; पोलिसांचे अभय, गोव्यासाठी धोक्याचा इशारा

एकेकाळी महिलांची स्वंयसेवी संस्था किंवा पोलिसांकडून सुटका केली जायची. अनेकवेळा संस्थेच्या सिस्टर अशा महिलांशी संवाद साधून त्यांना पुनर्वसन केंद्रात घेऊन यायच्या.

'कोरोनाच्या पूर्वी सिस्टर साध्या कपड्यांमध्ये बाहेर जाऊन महिलांचे निरीक्षण करायच्या, त्यांच्याशी ओळख वाढवून मैत्री करायच्या. महिलांना केंद्रात बोलवून त्यांना मार्गदर्शन केले जायचे. अनेक महिलांची लग्न झाली, काही नोकरीसाठी परदेशी गेल्या तर काही महिला त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत,' असे कोम्पन सांगतात.

कोम्पन यांनी यावेळी एका महिलेचा किस्सा सांगितला. एक मुलगी केंद्रात आली, पुनर्वसन केंद्रातून मार्गदर्शन घेतल्यानंतर तिचे लग्न झाले. एके दिवशी महिला पतीच्या घरातून पळून गेली. आम्ही महिलेचा शोध घेतला तर ती मुंबईच्या रेड लाईट परिसरात आढळून आली. तिला माघारी आणले आणि पुन्हा पतीच्या स्वाधीन केले. सध्या त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे, असे कोम्पन यांनी सांगितले.

नुवे येथील अ‍ॅडॉरर्स सिस्टर लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या मुलींची काळजी घेतात, त्यांना मोफत शिक्षणसेवा पुरवतात. कौतुकास्पद बाब म्हणजे हे सर्व सेवा त्या निशुल्क पद्धतीने देतात.

मुली जेव्हा नोकरीला सुरुवात करतात तेव्हा त्यांना बँकेत खाते उघडण्यास सांगितले जाते. आम्ही त्यांच्यासाठी वर पाहण्याचे कार्यक्रम देखील आयोजित करतो, अशी माहिती कोम्पन यांनी दिली.

केंद्रात राहणाऱ्या एका तीस वर्षीय महिलेला मुलाला भेटायचे आहे, आम्ही तिला फक्त भेट घेऊ नको तर त्याच्यासोबत काही दिवस व्यतित कर असा सल्ला दिला. मायलेकांमधील नातं दृढ होण्याची गरज आहे, असे कोम्पन म्हणतात.

स्त्रियांच्या लैंगिक शोषणाला आळा घालून त्यांना देवाच्या चांगुलपणाची अनुभूती देणे हे संत मारिया मायकेलाचे धेय्य होते. याच उद्देशाने 1856 मध्ये त्यांनी सिस्टर अ‍ॅडॉरर्सच्या संघटनेची स्थापना केली.

- अगस्तो रॉड्रिग्ज

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com