Drug Nexus In Goa: संगीत पार्ट्या अमली पदार्थ तस्करीचे तळ; पोलिसांचे अभय, गोव्यासाठी धोक्याचा इशारा

अमली पदार्थ प्रकरणी २०२३ मध्ये झालेल्या या चार मोठ्या कारवाया गोव्यासारख्या लहान राज्यासाठी धोक्याचा इशारा आहे.
Loud Music Parties In Goa And Drug Nexus
Loud Music Parties In Goa And Drug NexusDainik Gomantak
Published on
Updated on

अमली पदार्थ विरोधी पथकाने 28 एप्रिल 2023 पासून आत्तापर्यंत गोव्यात ड्रग्जविरोधी चार मोठ्या कारवाया केल्या आहेत. यामुळे गोवा अमली पदार्थ विक्रीचे मोठे केंद्र आहेच शिवाय नाईट पार्टीमध्ये अमली पदार्थांना मोठी मागणी असते, हे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

गोव्यातील मोठ्या आवाजातील संगीत पार्ट्या हेरून अमली पदार्थ विक्रेते बाहेरील राज्यात तस्करीसाठी जाळे निर्माण करतात.

'अमली पदार्थ विक्रेते गोव्यातील उच्च आवाजातील संगीत पार्टी स्पॉट्सचा वापर देशाच्या इतर राज्यांमध्ये बाजारपेठ निर्माण करण्यासाठी करतात. आम्ही गोवा पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली पण गोवा पोलीस याकडे गांभीर्याने पाहत नाहीत.' अशी माहिती हैदराबादच्या एका उच्च आयपीएस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर गोमन्तक डिजिटलला दिली.

अमली पदार्थ विरोधी चार मोठ्या कारवाया

आश्वे, मांद्रे येथे २८ एप्रिल रोजी रशियाच्या प्रसिद्ध स्विमरला अमली पदार्थ प्रकरणी अटक केली. गोवा पोलिसांना या कारवाईत स्थानिकांची मदत मिळाली होती.

तसेच, ३ मे रोजी पोलिसांनी हणजूणे येथे ड्रग्ज कारखान्यावर छापा मारून पश्चिम बंगालच्या नागरिकाला अटक केली. यावेळी एलएसडी आणि एमडीएमए नावाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेतून दुबईमार्गे गोव्यात आलेल्या केनियाच्या नागरिकाला दाबोळी विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्या खिशात एक किलो वजनाचे कोकेन आढळून आले, दिल्लीतील नाजेरियन व्यक्तीला त्याची विक्री करणार होता.

हैद्राबाद येथून गोव्यात येणाऱ्या महिलेल्या देण्यासाठी तस्करी करण्यात आलेले ५.२ किलो ग्रॅम अमली पदार्थ दोन ऑगस्ट रोजी जप्त करण्यात आले.

अमली पदार्थ प्रकरणी २०२३ मध्ये झालेल्या या चार मोठ्या कारवाया गोव्यासारख्या लहान राज्यासाठी धोक्याचा इशारा आहे. हैद्राबाद पोलिसांनी यापूर्वी गोवा पोलीस अमली पदार्थ कारवाईप्रकरणी सहकार्य करत नसल्याचा आरोप केला होता.

"गोवा पोलिसांना आम्ही आमच्यासाठी चौकशी करण्यास सांगितले नाही. आमची चौकशी शून्य आहे आणि आम्ही सर्व अडचणींना तोंड देत आहोत. आम्हाला फक्त त्या लोकांना अटक करण्यासाठी आम्ही मदत मागितली. पण खरचं आम्हा मदत केली जात होती का गुन्हेगारांना हे एक अधिकारी म्हणून माझ्या लक्षात येत होते." असा दावा हैदराबादच्या एका आयपीएस अधिकाऱ्याने केला.

Loud Music Parties In Goa And Drug Nexus
Abbott Licence Suspension: सात दिवसांत परिस्थिती सुधारा, FDA गोवाकडून प्रसिद्ध युएस औषध कंपनीला परवाना निलंबित करण्याचा इशारा

"गोव्यात असे लोक आहेत जे थेट अमली पदार्थांच्या विक्रीत गुंतलेले आहेत याची माहिती आम्हाला आहे. अमली पदार्थ विक्रीला प्रोत्साहन देणारे लोकही आहेत. आणि आमच्यासाठी दोघेही गुन्हेगार आहेत, हैद्राबादमध्ये येणारे बहुतांश अमली पदार्थ थेट गोव्यातून येतात," असेही अधिकाऱ्याने ठामपणे सांगितले.

वेळोवेळी हैदराबादमध्ये अटक करण्यात आलेल्या संशयितांनी त्यांचे पुरवठादार गोव्यात असल्याची कबुली दिली आहे.

'हैद्राबादचे काही लोक गोव्यात देखील अटक झाले आहेत, पण ते अमली पदार्थ घेऊन पुन्हा येथेच येणार होते. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नकर्कश संगीत पार्टीत मोठ्या प्रमाणावर ग्राहक येत असतात. आणि तिथून पुढे तस्करीचे मार्ग निर्माण होतात. असेही आमच्या गुप्तहेर अधिकार्‍यांच्या लक्षात आले आहे.' असे ते म्हणाले.

धक्कादायक बाब म्हणेज पोलिस स्टेशनच्या शेजारीच मोठ्या आवाजातील पार्टी होत असतात. पण, कायद्याचे रक्षण करणाऱ्यांचे नातेवाईक देखील एखाद्या दिवशी अंमली पदार्थांना बळी पडू शकतात हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

- अगस्तो रॉड्रिग्ज

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com