
मडगाव: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ''नवरत्न'' म्हणून सूचीबद्ध कंपनी आहे. ही कंपनी ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग, केटरिंग, पर्यटन, रेल नीर आणि हॉस्पिटॅलिटी सेवांसह विविध सेवा देते. आयआरसीटीसीच्या पश्चिम विभाग मुंबई कार्यालयाने ५ ऑगस्ट रोजी मडगाव येथून भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे ‘अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा’ सुरू करण्याची घोषणा केली आहे.
भारत गौरव टूर पॅकेजेसद्वारे या श्रावणात प्रवाशांना संस्मरणीय सुटीचा अनुभव घेता येईल. पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा म्हणाले की, हे पॅकेज देशातील प्रमुख ज्योतिर्लिंग व इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्याचा एक अनुकूल आणि सोईस्कर मार्ग प्रदान करते, जे खिशाला परवडणारे तर आहेच पण त्याच बरोबर आरामदायी रेल्वे प्रवासाची सुद्धा हमी देते. ५ ऑगस्ट रोजी मडगावहून सुरु होणाऱ्या टूर पाककजेची किंमत प्रति व्यक्ती अंदाजे २३,८८०/- रुपये पासून सुरू होते.
झा म्हणाले की, आमचे ध्येय प्रवास अधिक सुलभ आणि आनंददायी बनवणे आहे, जेणेकरून प्रत्येक ट्रीप संस्मरणीय होईल. हे पॅकेज सुविधा, आराम आणि खिशाला परवडणारे असावे या उद्देशाने डिझाईन केले आहे. त्यात कन्फर्म रेल्वे तिकिटासह राहण्याची सोय, राहण्याची सोय, पर्यटनाच्या ठिकाणी बसेस ने फिरण्याची सोय, ऑन-बोर्ड आणि ऑफ-बोर्ड जेवण, टूर गाइड, प्रवास विमा असे सगळे समाविष्ट केले आहे. भारत गौरव गाड्यांमध्ये स्लीपर (नॉन-एसी), एसी III टियर आणि एसी II टियर कोचचे मिश्रण असते. गाडीची एकूण क्षमता सुमारे ६००-७०० प्रवासी घेऊन जाण्याची आहे.
हे पॅकेज ऑनलाइन होताच आयआरसीटीसीचे नियमित ग्राहक, आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या संकेत स्थळावरून ऑनलाइन बुकिंग करू शकतात. अधिक माहितीसाठी www.irctctourism.com ला भेट द्यावी किंवा पश्चिम विभाग मुंबई कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
सासष्टी : भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रेला गोव्यात चांगला प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत सुमारे १७० प्रवाशांनी नोंदणी केली आहे. ही यात्रा सुरु होईपर्यंत आणखीही यात्रेकरुंची यात भर पडणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.