

Amritsar to Margao Special Train
पणजी: नाताळ, न्यू ईयरच्या निमित्ताने येणाऱ्या सलग सुट्टयांच्या पार्श्वभूमीवर गोव्यासाठी विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. पंजाबमधून सुटणारी ही ट्रेन दिल्ली, गुजरात मुंबईतून गोव्यात दाखल होणार आहे. गोव्यात व्हेकेशनसाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता, प्रवाशांच्या सोईसाठी या ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे.
Amritsar to Margao Train
अमृतसर ते मडगाव (गोवा) ही विशेष ट्रेन लुधीयाना, अंबाला, पानिपत, दिल्ली, मथुरा, सवाई माधोपूर, कोटा, रतलाम, सुरत, पनवेल यासह विविध स्थानकांवर थांबा घेईल. ही ट्रेन दोन्ही बाजुने तीन – तीन फेऱ्या करणार आहे. ट्रेनसाठी बुकिंग सुरु झाले आहे. हिवाळी विशेष ट्रेन अमृतसर ते मडगाव (ट्रेन नंबर ०४६९४) २२, २७ डिसेंबर आणि ०१ जानेवारी रोजी धावणार आहे.
Margao To Amritsar Train
तर, मड़गाव ते अमृतसर (ट्रेन नंबर ०४६९३) २४, २५ डिसेंबर आणि ०३ जानेवारी रोजी परतीचा प्रवास करणार आहे. अमृतसर मडगाव एक्सप्रेस सोमवार आणि शनिवार पहाटे ०५ वाजता स्थानकावरुन रवाना होईल. ही ट्रेन अनुक्रमे मंगळवार आणि रविवारी रात्री ११.५५ वाजता मडगाव स्थानकावर दाखल होईल.
Coach Position
या विशेष ट्रेनमध्ये थर्ड एसी इकॉनॉमी आणि थर्ड एसी कोच लावण्यात आले आहेत. ट्रेन गोवा आणि कोकणात विविध थांबे घेणार आहे
गोवा आणि कोकणातील थांबे (Train Stops)
करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुंडल, कणकवली, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, मानगाव, रोहा, पनवेल, वसई रोड एवढे थांबे घेईल.
याशिवाय पुढे सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर सिटी, मथुरा, दिल्ली, सफदरगंज, पानिपत, अंबाला, लुधियाना, जालंधर आणि ब्यास स्थानकांवर ट्रेन थांबा घेईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.