Cyber Attack: 'सायबर' हल्ल्याचा धोका वाढला! गुगलची 250 कोटी जीमेल यूजर्संना तातडीची चेतावणी जारी; पासवर्ड बदलण्याची केली सूचना

Google Gmail Warning: जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी असलेल्या गुगलने आपल्या 2.5 अब्ज (सुमारे 250 कोटी) जीमेल वापरकर्त्यांसाठी एक गंभीर सुरक्षा चेतावणी जारी केली आहे.
Google Gmail Warning
Google Gmail Dainik Gomantak
Published on
Updated on

Google Gmail Warning: जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी असलेल्या गुगलने आपल्या 2.5 अब्ज (सुमारे 250 कोटी) जीमेल वापरकर्त्यांसाठी एक गंभीर सुरक्षा चेतावणी जारी केली आहे. हॅकर्सचे वाढते हल्ले पाहता गुगलने जीमेल वापरकर्त्यांना त्वरित आपला पासवर्ड बदलून ‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ (Two-Step Verification) फीचर ऑन करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या सायबर हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दररोज अनेक लोक या हल्ल्यांना बळी पडत आहेत.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, या सायबर हल्ल्यांमागे ‘शायनीहंटर्स’ (ShinyHunters) नावाच्या एका धोकादायक हॅकिंग ग्रुपचा हात असण्याची शक्यता आहे. पोकेमोन फ्रँचायझीवरुन प्रेरित झालेला हा ग्रुप 2020 पासून सक्रिय असून अनेक मोठ्या कंपन्यांच्या डेटा चोरीशी तो जोडला गेला आहे.

कोण आहे 'शायनीहंटर्स' ग्रुप?

‘सिलिव्ह डॉट कॉम’ (SILIVE.com) च्या अहवालानुसार, मायक्रोसॉफ्ट (Microsoft), एटी अँड टी (AT&T), सँटँडर (Santander) आणि टिकटमास्टर (Ticketmaster) सारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या डेटा चोरीमध्ये याच ग्रुपचा हात असल्याचे मानले जाते. या ग्रुपची लोकांना फसविण्याची सर्वात धोकादायक पद्धत म्हणजे ‘फिशिंग’ (Phishing) आहे.

Google Gmail Warning
ब्रेकअप के बाद... हृदय तुटल्यानंतर Google मधील अडीच कोटी पगाराच्या नोकरीवर मारली लाथ; सुरु केला स्वत:चा व्यवसाय

फिशिंगमध्ये हॅकर्स अत्यंत काळजीपूर्वक बनवलेल्या बनावट ई-मेल्सचा वापर करतात. हे ई-मेल्स इतके खरे वाटतात की, वापरकर्ते सहजपणे त्यात फसतात. या ई-मेल्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर ते थेट बनावट लॉगिन पेजवर पोहोचतात, जिथे ते आपला पासवर्ड, सुरक्षितता कोड आणि इतर संवेदनशील माहिती देतात. या माध्यमातून हॅकर्स वापरकर्त्यांची गोपनीय माहिती चोरतात. या ग्रुपने यापूर्वी चोरी केलेला बराचसा डेटा सार्वजनिकपणे उपलब्ध होता, पण गुगलने चेतावणी दिली आहे की, हा ग्रुप आणखी मोठे हल्ले करण्याची तयारी करत आहे.

गुगलची तातडीची चेतावणी का?

गुगलच्या (Google) ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, "आमच्या मते, ‘शायनीहंटर्स’ ग्रुप ‘ब्रँड डेटा लीक साइट’ (DLS) सुरु करुन खंडणी वसूल करण्याची आपली रणनीती अधिक तीव्र करण्याच्या तयारीत आहे." यामुळे 8 ऑगस्ट रोजी गुगलने संभाव्यतः प्रभावित झालेल्या जीमेल वापरकर्त्यांना ई-मेल पाठवून त्यांच्या अकाउंटची सुरक्षा त्वरित वाढवण्याचा सल्ला दिला होता.

याच पार्श्वभूमीवर, गुगलने 'टू-स्टेप व्हेरिफिकेशन' ऑन करण्याचे आवाहन केले आहे. हे फीचर तुमच्या अकाउंटसाठी सुरक्षिततेचा एक अतिरिक्त पर्याय आहे. याचा फायदा असा की, जरी एखाद्या हॅकरला तुमचा पासवर्ड मिळाला, तरीही तो तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश करु शकणार नाही, कारण प्रवेशासाठी त्याला दुसऱ्या एका कोडची आवश्यकता असेल.

Google Gmail Warning
Google AI: ‘रोजच्या कामात एआयचा वापर करा, अन्यथा…’, गुगलचा कर्मचाऱ्यांना सल्ला

टू-स्टेप व्हेरिफिकेशन का गरजेचं?

‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ लावल्यानंतर, पासवर्ड टाकल्यावर दुसऱ्यांदा एक कोड टाकावा लागतो. हा कोड सहसा तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ऑथेंटिकेटर ॲपवर येतो. त्यामुळे पासवर्ड चोरीला गेला तरीही हॅकर तुमच्या अकाउंटचा गैरवापर करु शकत नाही. गुगलची ही चेतावणी केवळ त्या लोकांसाठी नाही, ज्यांना थेट लक्ष्य केले गेले आहे. आजकाल ई-मेल अकाउंटचा वापर बँकिंग, शॉपिंग आणि सोशल मीडिया (Social Media) लॉगिनसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा परिस्थितीत, जर जीमेल अकाउंट हॅक झाले, तर अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामध्ये आर्थिक फसवणूक आणि ओळख चोरीचा समावेश आहे.

Google Gmail Warning
Google Search Live: गुगलचं भन्नाट AI फिचर लॅान्च! टायपिंगला करा रामराम, आता गुगलशी बोला आणि मिळवा हवं ते उत्तर

दरम्यान, या धोकादायक सायबर हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जीमेल वापरकर्त्याने तातडीने आपला पासवर्ड बदलून तो अधिक मजबूत करायला हवा आणि त्याचबरोबर ‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ हे सुरक्षा कवच त्वरित सक्रिय करायला हवे. हॅकर्सच्या वाढत्या हल्ल्यांमध्ये सतर्क राहणे हीच आपल्या डिजिटल सुरक्षिततेची पहिली पायरी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com