Goa Monsoon Update: गोव्यात ‘यलो अलर्ट’ जारी

येणाऱ्या काही दिवसांत गोव्यात (Goa) पावसाचा (Monsoon) जोर वाढणार असल्याची शक्यता आहे.
गोव्यात (Goa) पावसाचा (Monsoon) जोर वाढणार असल्याची शक्यता
गोव्यात (Goa) पावसाचा (Monsoon) जोर वाढणार असल्याची शक्यताDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी - राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गुरुवारी पुन्हा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला. बुधवारी (ता. 23) वेधशाळेने कोणताही अलर्ट जारी केला नव्हता. पण, पावसाने या अंदाजाला हुलकावणी दिली.

दिवसभर पावसाची रिपरीप सुरूच होती. पेडणे आणि वाळपई भागात नेहमीप्रमाणे पावसाचा जोर होता. वेधशाळेने पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र शुक्रवारी राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगत हवामान वेधशाळेने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे, असे एम. राहुल यांनी सांगितले.

गोव्यात (Goa) पावसाचा (Monsoon) जोर वाढणार असल्याची शक्यता
जन्मठेप झालेल्या आरोपींचा मुदतपूर्व सुटकेचा अर्ज फेटाळला
गोव्यातील पावसाचे तपशील
गोव्यातील पावसाचे तपशीलDainik Gomantak
गोव्यात (Goa) पावसाचा (Monsoon) जोर वाढणार असल्याची शक्यता
अनलॉक करण्याची घाई नको; 7 जिल्ह्यांना जास्त काळजी घेण्याची गरज

पन्नास टक्क्यांहून अधिक पेरण्या पूर्ण

राज्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर 50 टक्क्यांहून अधिक पेरण्या आणि लागवड पूर्ण झाली आहे. येत्या आठवडाभरात उद्दिष्टपूर्ती होईल, असे सहाय्यक कृषी संचालक प्रसन्नकुमार यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

राज्यात यंदा सुमारे 27 हजार हेक्टर जमिनीत भाताची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 250 टन भात बियाण्यांचे वितरण करण्यात आले. शेतकरी भाताचे वाफे मान्सूनपूर्व काळात तयार ठेवतात. मान्सून वेळेत पोहचल्याने शेतकऱ्यांना भात लागवडीसाठी अनुकूल वातावरण मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com