MLA Divya Rane: ''स्थानिक आमदार म्हणून मी 'त्या' कुटुंबीयांच्या पाठीशी''; मोर्लेतील घटनेनंतर दिव्या राणेंकडून मदतीता हात

भर पावसात घरावर झाड पडल्याने कुटुंबासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती
MLA Divya Rane
MLA Divya RaneDainik Gomantak
Published on
Updated on

MLA Divya Rane गेल्या काही दिवसात पडणाऱ्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे सत्तरीत अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुरुच आहे. गेल्याच आठवड्यात वादळी वाऱ्याचा फटका बसून मोर्ले सत्तरी येथील सखाराम बाबलो मळीक यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घराच्या छप्पराची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली.

भर पावसाच्या दिवसात घरावर झाड पडल्याने कुटुंबासमोर मोठी अडचण निर्माण झाले होती. मळीक कुटुंब हे गरीब असुन घराचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान त्याचबरोबर घराची दुरुस्ती कशी करावी हा पेच प्रसंगामुळे कुटुंबावर मोठे संकट आले होते.

या संबंधीची माहिती स्थानिक आमदार तथा गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा सौ. दिव्या विश्वजित राणे यांना मिळताच त्यांनी तातडीने सखाराम मळीक यांना मदतीचा हात पुढे करुन आर्थिक मदत सुपुत केली. सदर मदत ही घर दुरुस्तीकरण्यासाठी करण्यात आली आहे.

MLA Divya Rane
Goa Tiger reserve: ‘एनटीसीए’च्या व्याघ्र प्रकल्प निकषामध्‍ये गोवा बसत नाही!

मळीक यांचा घरावर झाड पडुन छप्पराचे मोठे नुकसानी झाली. त्यामुळे आता दिव्या राणे यांनी केलेल्या मदतीने घरावर नवीन छप्पर घालण्यात येणार आहे. घराचे छप्पर पुर्ण पणे उद्वस्थ ढाले आहे. त्यामुळे पावसाच्या पाणी घरात शिरुन घरातील सामानाचेही मोठे नुकसान झाले. गेल्या शुक्रवार ही घटना घडली होती.

त्यावेळी त्यांचे कुटुंबीय घरातीच होते. त्यावेली त्यांना काही प्रमाणात दुखावत झाली होती. त्याचबरोबर वाळपई अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन मदत कार्य करुन झाड हटविले होते. त्याचबरोबर काही मालमत्ता वाचविण्यात आली.

मात्र पावसाचे दिवस असल्याने छप्पर कसे दुरुस्त करावे यांची त्यांना काळजी होती. सरकारतर्फे स्थानिक पंचायत व मामलेदार कार्यलातुन तलाठांनी येऊन पहाणी केली, मात्र जी सरकारनी मदत स्वरुप मदत आहे. ती काही लवकर मिळत नाही.

त्यामुळे त्यांच्या मोठे संकटत आले होते. मात्र स्थानिक पंचायत सरपंच व इतर पंच सदस्य रुपेश मळीक यांच्या सहकार्यामुळे आज आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्याकडून मदत मिळू शकली. त्यामुळे मळीक कुटुंबीयांनी आमदारांचे आभार मानले आहे.

यावेळी डाॅ. दिव्या राणे यांनी सखाराम मळीक यांना आर्थित मदत सुपुर्द करते वेळी मोर्ले सरपंच अमित शिरोडकर, रंजना गावस, रुपेश मळीक तसेच इतर पंच सदस्यांची उपस्थिती होती.

MLA Divya Rane
केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे राज्यात रायबंदर येथे आरोग्य सेवा, संशोधन सुविधा; 14 जुलै रोजी होणार उद्घाटन

सखाराम मळीक:-

घरावर झाड पडल्यामुळे घराचे छप्पर मोडले आहे, कौलारु घर असल्याने घराचे कौल फुटले आहे. त्याचबरोबर पावसाचे पाणी घरात शिरत होते. जेव्हा ही दुर्घटना झाली जेव्हा कुटुंबील मुले व बायको घरातच होती. त्यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र आम्ही गरीब आहोत व जवळपास घराचे 12 - 13 लाखांचे नुकसान झाले आहे. आमदारांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केल्यामुळे त्यांचे आभार.

आमदार डाॅ. दिव्या राणे :-

सत्तरीतील प्रत्येक नागरिकांचे प्रश्न हे आमचे प्रश्न असुन त्यांची समस्या सोडवणे आमचे कर्तव्य आहे. सत्तरीचा विकास करताना नागिरकांचे प्रश्न सोडविले पाहिजे. मळीक हे गरीब कुटुंबीय आहे. स्थानिक आमदार म्हणून त्यांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी धेतली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com