Goa Monsoon Rainfall 50 Inches: गोव्यात तब्बल 58 दिवसांनंतर पावसाच्या इंचाचे अर्धशतक; गतवर्षीच्या तुलनेत यंदा 16 दिवस अधिक, 31 जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा

Goa Monsoon Weather Update: मान्सून सुरू झाल्यानंतर तब्बल ५८ दिवसांनी राज्यातील पावसाच्या इंचाचे अर्धशतक पूर्ण झाले.
Goa Monsoon Weather Update
Goa Monsoon Rainfall 50 InchesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मान्सून सुरू झाल्यानंतर तब्बल ५८ दिवसांनी राज्यातील पावसाच्या इंचाचे अर्धशतक पूर्ण झाले. मंगळवारी सकाळपर्यंत ४९.९९ इंच पावसाची नोंद झालेली होती. त्यानंतर दिवसभर अनेक भागांत पाऊस सुरूच होता. त्यामुळे पावसाने इंचाचे अर्धशतक पार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

१ जून ते २८ जुलै या मान्सून हंगामात राज्यात सरासरी ७३.५१ इंच पावसाची नोंद होत असते. पण, यंदा मात्र या काळात तो ५० इंचांपर्यंतच पोहोचल्याने सरासरी पावसातील तूट ३२ टक्के इतकी झाली आहे. गतवर्षी १ जून ते २८ जुलै या काळात राज्यात ७७.०५ इंच पाऊस पडला होता.

तर, १२ जुलै रोजीच पावसाने इंचाचे अर्धशतक पूर्ण केले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र पन्नाशी गाठण्यासाठी पावसाने १६ दिवस अधिक घेतले. दरम्यान, यंदा मान्सूनचा पाऊस राज्यात वेळेत म्हणजेच ५ जून रोजी दाखल झाला.

Goa Monsoon Weather Update
Goa Heavy Rain: पावसाच्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला, पण सत्तरीत ढगफुटीसदृश पावसामुळे रस्ते जलमय, जनजीवन ठप्प

परंतु, त्यानंतर १५ दिवस पावसाने राज्याकडे पाठ फिरवली. २१ जूनला पुन्हा पावसास सुरुवात झाली. पण, काही दिवस कोसळून पावसाने पुन्हा विश्रांती घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून पाऊस सातत्याने कोसळत असून, ३१ जुलैपर्यंत तो कायम राहण्याची शक्यता वर्तवत हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्टही जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com