Goa Monsoon 2023: सत्तरीत संततधार; धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा

पुराचा धोका : चोर्ला घाटात दरड कोसळणे सुरूच; जनजीवन विस्कळीत !
Chorla
ChorlaDainik Gomantak

Goa Monsoon 2023 संततधार पावसामुळे सत्तरी तालुका जलमय झाला आहे, तसेच पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. रात्री पासून धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वहात असून अंजुणे धरण भरले असून धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले.

अंजुणे धरणाची पातळी 90 मीटरवर पोहोचल्याने धरणातून विसर्ग सुरू झाला असून धरणालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान,चोर्ला घाटात दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच असून झाडांची पडझड होत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार घडले.

आज रस्त्यावर जंगली झाडासकट दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्यात आला.

Chorla
Goa Congress: ‘सप्तकोटीश्वर’ गळती हा सरकारचा नवा घोटाळा

वेळुस नदी दुथडी भरुन वाहत असून नदी काठच्या रामा गावकर यांच्या बागायतीत पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी या ठिकाणी पूरस्थिती उद्‍भवते.

आज होंडा येथे काही भागात संरक्षक भिंतीअभावी ओहोळातील पाण्यामुळे पूरस्थिती उद्‍भवली आहे. भुईपाल भेटशेवाडा पूल पाण्याखाली गेला आहे. शेळ मेळावली येथे रस्त्यावर जंगली झाड पडले. पर्ये सरकारी शाळेजवळ काजूचे झाड पडले. पडझ़डीमुळे लाखाेंची हानी झाली.

वडदेवनगरात 12 घरांत घुसले पाणी

वडदेवनगर येथे प्रमुख ओहोळालगतच्या 12 घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. ओहळाच्या बाजुला असलेल्या काही घरातील नागिरकांना होंडा वाळपई रस्ता गाठण्यासाठी गळाभऱ पाण्यातून वाट काढत जावे लागले.

Chorla
Sawardem News : सावर्डे मतदारसंघात नद्यांवर ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजनेअंतर्गत दहा बंधारे उभारण्यात येणार

नद्यांच्या पातळीत वाढ

वेळुस नदी, वेळुस नाला, रगाडा नदी, म्हादय नदीने धोक्याची पातळी गाढण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. तसेच आज अंजुणे धरणाचेही दरवाजे उघडे असल्याने आजूबाजूच्या गावांना धोका वाढला आहे.

रस्ते पाण्याखाली, शाळांना सुट्टी द्या!

मुसलधार पावसामुळे सत्तरीतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे वाहतुकस धोकादायक आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुक करताना अडथळा निर्माण होत आहे.

तसेच शाळा, काॅलेजमध्ये जाण्यासाठी ग्रामीण भागातून मुले वाळपईत येतात. त्यामुळे अनेकांना त्रास होत आहे. यामुळे पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी काही पालकांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com