Goa Congress: ‘सप्तकोटीश्वर’ गळती हा सरकारचा नवा घोटाळा

अमरनाथ पणजीकर : ‘मिशन टोटल कमिशन’मुळे निकृष्ट कामे
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress: भाजप सरकारच्या ‘मिशन टोटल कमिशन’मुळे निकृष्ट कामे होत असून त्याची प्रचीती येत आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या सप्तकोटीश्वराच्या मंदिराची गळती हा भाजप सरकारचा आणखी एक घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

सरकारने श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या नूतनीकरणावर 7.7 कोटी खर्च करून फेब्रुवारीमध्ये उद्‌घाटन केले. आज छताला गळती लागली आहे. या ‘मिशन टोटल कमिशन’ सरकारने केलेल्या निकृष्ट कामामुळेच असे होत आहे, असे पणजीकर म्हणाले.

Goa Congress
Akash Byju's in Goa: विद्यार्थ्यांची उज्ज्वल स्वप्ने साकारण्यासाठी ‘आकाश बायजूज’ने उघडली कवाडे

ते पुढे म्हणाले, ऐतिहासिक श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवा सरकारचे अभिनंदन केले होते.

हिंदूच्या नावावर मते मिळवणारा भाजप मंदिर जीर्णोद्धारासारख्या प्रकल्पातही भ्रष्टाचार करत आहे, हे खूप वाईट आहे. आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राज्यातील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल जाब विचारावा, असे पणजीकर म्हणाले.

Goa Congress
Revolutionary Goans ची ‘बस्ती हटाव’ मोहीम! बिगर गोमंतकीयांकडून सुरक्षा यंत्रणेलाच धोका

दुसऱ्यावर आरोप... : या प्रकरणाची चौकशी करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, कारण नूतनीकरणापूर्वी छप्पर कधीही गळत नव्हते, असे दिसते की भाजपचे मंत्री नूतनीकरण प्रकल्पांवर पैसे कमवत आहेत आणि ते कधीही त्याची जबाबदारी घेत नाहीत, उलट ते दुसऱ्या खात्यांवर आरोप करताना दिसतात, असेही पणजीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com