Sawardem News : सावर्डे मतदारसंघात नद्यांवर ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजनेअंतर्गत दहा बंधारे उभारण्यात येणार

सुभाष शिरोडकर : ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजनेस चालना
Subhash Shirodkar
Subhash ShirodkarDainik Gomantak
Published on
Updated on

यंदा मॉन्सून काही दिवस लांबणीवर पडल्यामुळे राज्यातील अनेक धरणांची पातळी खूपच खालावली होती. त्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर सावर्डे मतदारसंघातील नद्यांवर ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेअंतर्गत आणखी दहा बंधारे उभारण्यात येणार असल्याची माहिती जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सावर्डे मतदारसंघाच्या भेटीदरम्यान दिली.

यावेळी त्यांच्यासोबत सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गावकर, जलस्रोत खात्याचे अधिकारी दिलीप नाईक, साकोर्डाच्या सरपंच प्रिया खांडेपारकर, कुळे-शिगावचे सरपंच गोविंद शिगावकर,

उपसरपंच शिरीष देसाई, साकोर्डाचे पंच सदस्य जितेंद्र कालेकर, संजना नार्वेकर, दाभाळचे पंच कल्पेश गावकर, एसटी मोर्चाचे सरचिटणीस मोहन गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिरोडकर म्हणाले की, सावर्डे मतदारसंघातील नद्यांवर सध्या उभारलेले बंधारे संख्येने अत्यंत कमी असून येथे अनेक नद्या तसेच ओहोळ आहेत. त्यातील रगाडा, खांडेपार आणि काळी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असते.

Subhash Shirodkar
Goa Assembly Monsoon Session : अंमली पदार्थांच्या घटनांमद्धे राज्यात घट - मुख्यमंत्री | Gomantak Tv

म्हणून सावर्डे मतदारसंघाला भेट देऊन येथील जलस्रोेतांची पाहणी केली, जेणेकरून गरज पडल्यास येथे बंधारे उभारले जातील. हे पाणी सावर्डे मतदारसंघात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही वापरता येईल.

हिंटरलॅण्ड टुरिझमला चालना

मतदारसंघातील उपलब्ध जलस्रोतांमुळे हिंटरलॅण्ड टुरिझमलाही चालना मिळणार असल्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. येथील नद्यांवर बंधारे उभारल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याचा पुष्कळ फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार डॉ. गणेश गावकर म्हणाले की, जीटीडीसीमार्फत सावर्डे मतदारसंघात हिंटरलॅण्ड टुरिझम सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या माध्यमातून सावर्डेतील बेरोजगारीही संपुष्टात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com