पणजी: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होत आहे. येत्या चार दिवसांत गोव्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.
गोवा हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात २० ते २४ ऑगस्ट दरम्यान वादळी वारे वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून, वेधशाळेने यलो अलर्ट जारी केला आहे. दोन्ही जिल्ह्यात २३ आणि २४ तारखेला मुसळधार पावसाचा अंदाज (Goa Weather Update) वर्तविण्यात आला आहे.
याकाळात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ५० किमी प्रतितासाने वारे वाहू शकते असे वेदशाळेने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीवर असलेला पाऊस राज्यात पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Rain Recorded in last 24 hours in Goa
गेल्या चोवीस तासांत गोव्यात विविध ठिकाणी किरकोळ पावसाची नोंद झाली आहे. म्हापशात ३४.३ मिमि, मुरगाव ३०.४, पणजीत २८ मिमि, केपे आणि फोंड्यात १५ मिमि पावसाची नोंद झाली आहे.
पडझडीच्या घटनांमध्ये घट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात होणारा पावसाचा शिडकावा वगळता राज्यातील हवामान (Goa Weather) कोरडे आहे. याकाळात राज्यातील पडझडीचे प्रमाण देखील घटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.