मडगाव मुख्‍याधिकाऱ्यांची कमाल एका दिवसात 200 फाईल्स केल्या हातावेगळ्या, पालिकेच्या तिजोरीत 14 लाखांची भर

Margao Municipal Council: प्रलंबित फायलींचे प्रकरण उघडकीस आल्‍यानंतर मुख्‍याधिकार्‍यांनी प्राधान्‍यक्रमाने फायली हातावेगळ्‍या केल्या.
मडगाव मुख्‍याधिकाऱ्यांची कमाल एका दिवसात 200 फाईल्स केल्या हातावेगळ्या, पालिकेच्या तिजोरीत 14 लाखांची भर
Margao Municipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Municipal Council

मडगाव: आपल्‍या कार्यक्षम कारभारासाठी प्रसिद्ध असलेले मडगाव पालिकेचे मुख्‍याधिकारी अजित पंचवाडकर यांनी फायली हातावेगळ्‍या करण्‍याचा सपाटा लावला असून गेल्‍या बुधवारी एकाच दिवशी त्‍यांनी तब्‍बल 200 फायली माेकळ्‍या केल्‍या.

त्‍यामुळे एकाच दिवशी सुमारे 14 लाख रुपयांची भर पालिकेच्‍या तिजोरीत पडली. त्‍यामुळे पालिका प्रशासनाला काही प्रमाणात वेग आला.

मुख्‍याधिकारी पंचवाडकर यांनी नुकताच पालिकेच्‍या अन्‍य अधिकार्‍यांबरोबर घेतलेल्‍या कार्यालयीन आढाव्‍यादरम्‍यान शेकडो फायली मुख्‍याधिकार्‍यांच्‍या दालनात गेल्‍या अनेक दिवसांपासून पडू्न असल्‍याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्‍याचे समोर आले होते.

प्रलंबित फायलींचे प्रकरण उघडकीस आल्‍यानंतर मुख्‍याधिकार्‍यांनी प्राधान्‍यक्रमाने फायली हातावेगळ्‍या करुन फायलींच्‍या मंजुरीच्‍या प्रतिक्षेत असलेल्‍या नागरिकांना न्‍याय मिळवून देण्‍याचा निर्णय घेतला.

मुख्‍याधिकारी पंचवाडकर यांनी नागरिकांना मडगाव नगरपालिकेतील त्‍यांच्‍या फायली अद्याप प्रलंबित असल्‍यास त्‍यांच्‍याशी पालिकेत संपर्क साधण्‍यास सांगितले आहे.

मडगाव मुख्‍याधिकाऱ्यांची कमाल एका दिवसात 200 फाईल्स केल्या हातावेगळ्या, पालिकेच्या तिजोरीत 14 लाखांची भर
गोव्‍यात आणल्‍या जाणार्‍या प्रत्‍येक गणेश मूर्तीची नोंद ठेवा; विजय सरदेसाईंचे मुख्य सचिवांना पत्र

पंचवाडकर यांनी मडगाव पालिकेत मुख्‍याधिकारी पदाचा पदभार स्‍वीकारल्‍यापासून फायली प्राधान्‍यक्रमाने हातावेगळ्‍या करत असल्‍याची माहिती दिली. पंधरवड्यापूर्वी पालिकेचा पदभार स्‍वीकारल्‍यापासून मी पडून असलेल्‍या फायली हातावेगळ्‍या करण्‍याचे काम करत आहे असे ते म्‍हणाले.

तसेच मी सोमवारी माझ्‍या चेंबरमध्‍ये उपलब्‍ध असेल. कोणत्‍याही नागरिकाला त्‍यांच्‍या फायलींबद्दल काही तक्रारी असल्‍यास ते संपर्क साधू शकतात असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao Railway Station
Goa political leaders clash over development projects
Margao Municipal Council Garbage Tender Scam
drunk beggars creating nuisance in Margao
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com