कोलकाताच्या लेकीला न्याय द्या! चौथ्या दिवशीही संप सुरुच; GMC मधील रुग्णसेवा 'व्हेंटिलेटर'वर

Kolkata doctor rape-murder case: सर्व डॉक्टरांनी न्यायासाठी लढणार असल्याचा सूर कायम ठेवला.
कोलकाताच्या लेकीला न्याय द्या! चौथ्या दिवशीही संप सुरुच; GMC मधील रुग्णसेवा 'व्हेंटिलेटर'वर
Resident Doctors Protesting In GMCDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Medical College

बांबोळी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळाच्या निवासी डॉक्टरांचा संप गेल्या चार दिवसांपासून सुरू असल्याने रुग्णसेवेवर होणारा परिणामाची तीव्रता आता वाढू लागली आहे. नियमित शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

दरम्यान, लैंगिक अत्याचार प्रकरणातील मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे.

कोलकाता येथील या प्रकरणाचा निषेध देशभरातून करण्यात येत आहे. गोवाही त्यास अपवाद नाही. आज मंगळवारी गोमेकॉतील ओपीडीजवळ एकत्र जमून निवासी डॉक्टरांनी आपला संप पुढे सुरूच ठेवला. सर्व डॉक्टरांनी न्यायासाठी लढणार असल्याचा सूर कायम ठेवला.

आवश्यक तेव्हा सेवा देतो, पण अन्याय विसरु शकत नाही

डॉक्टर संपावर असले तरी देखील आम्ही आमची जबाबदारी झटकलेली नाही. रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत.

आमची गरज लागते, तेव्हा आम्हाला बोलावले जाते आणि त्यावेळी आम्ही सहकार्य करण्यासाठी जातो. असे असले तरी एका महिला डॉक्टरवर झालेला अन्याय आम्ही विसरू शकत नाही. त्यासाठी न्यायाची मागणी करणे रास्त आहे, असे डॉ. नेहा यांनी स्पष्ट केले.

कोलकाताच्या लेकीला न्याय द्या! चौथ्या दिवशीही संप सुरुच; GMC मधील रुग्णसेवा 'व्हेंटिलेटर'वर
मडगाव मुख्‍याधिकाऱ्यांची कमाल एका दिवसात 200 फाईल्स केल्या हातावेगळ्या, पालिकेच्या तिजोरीत 14 लाखांची भर

न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप सुरूच ठेवणार आहोत. रुग्णांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. ज्यावेळी आमची गरज भासते, तेव्हा आम्ही रुग्णांना मदत करण्यासाठी तत्पर असतो.

- डॉ. नेहा (गोमेकॉ इस्पितळ)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com