Goa Monsoon 2023 : राज्‍यभरात पावसाचे थैमान; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

लाखोंचे नुकसान : वीजतारा तुटल्याने पुरवठा ठप्प
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon 2023 : गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सत्तरीत अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुरूच आहे. बुधवारी (ता.५) सायंकाळी दाबोस येथे सागवान झाड वीजतारांवर पडून मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर वीज नसल्याने पाणीपुरवठ्यावरही याचा परिणाम झाला. त्यानंतर रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व घटनास्थळी दाखल होऊन अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य केले.

तसेच वीज खात्याने वीजपुरवठा सुरळीत केला. गोवा वेधशाळेने राज्यात गुरुवार, ६ रोजी जारी केलेल्या पावसाच्या ‘रेड अलर्ट’चा साखळी भागावर तसा मोठा परिणाम जाणवला नाही. साखळीतील पावसाचा प्रभाव दररोज पडणाऱ्या पावसाइतकाच होता.

वाळपईत गटार व्यवस्था सुरळीत...

  • सत्तरीत समाधानकारक असा पाऊस पडत आहे.

  • वेळूस नदीची पाण्याची पातळी वाढू लागली आहे.

  • म्हादई नदी, रगाडा नदीचीही पाणीपातळी हळूहळू वाढू लागली आहे.

  • वाळपईत गटार व्यवस्था सुरळीत आहे. कुठेही पाणी तुंबलेले नाही.

Goa Monsoon 2023
Goa Congress - लोकसभा निवडणुकीवर काँग्रेसची बैठक | Gomantak Tv

येथे झाली पडझड...

  • घोटेली, केरी-सत्तरी येथे घरावर कोकमचे झाड पडले.

  • केळावडे-मोर्ले-सत्तरी येथे रस्त्यावर आंब्याचे झाड पडले.

  • घोलवाडा-पर्ये-सत्तरी येथे रस्त्यावर व वीजतारांवर झाड पडले.

  • केरी-सत्तरी येथे आंब्याचे झाड घरावर पडून नुकसान झाले.

  • पांशेवाडा-कुडशे-सत्तरी येथे रस्त्यावर काजूचे झाड पडले.

Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023: राज्‍यभरात पावसाचे थैमान; झाडे, दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

सत्तरीत गेल्या काही दिवसांपासून वारंवार झाडांची पडझड सुरूच आहे. त्यामुळे वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करत भर पावसात वीजपुरवठा सुरळीत करावा लागतो. पावसाळ्यात वीज खांबावर काम करणे एक जोखीमच असते. मात्र, नागरिकांना वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ते दिवस-रात्र काम करत असतात. त्याचबरोबर अग्निशमन दल होण्याऱ्या पडझडी दूर करण्यासाठी तातडीने मदतकार्य करते.

मडगाव परिसरात पूरसदृश स्थिती

मडगावात गेल्या ८ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गुरुवारी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याने सकाळी शहरात तशी मोठी वाहतूक नव्हती. त्याचबरोबर पाऊसही रिमझीम पडत होता. मात्र, दुपारपासून परत एकदा मोठ्या पावसाला सुरवात झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

Goa Monsoon 2023
Goa Tourism: राज्‍यात पर्यटनाला 'अच्छे दिन' नव्याने येणारा 'डिजिटल नोमॅड व्हिसा’ नेमका काय?

कोलवा सर्कलकडून जो बगल रस्ता जात आहे तो संपूर्ण भाग पाण्याखाली गेला आहे. कोंब येथील रेल्वे गेट, भुयारी रस्ता तसेच त्यापुढील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतांमध्ये पाण्याची उंची वाढल्याने आजूबाजूला असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यारस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहनांची मोठी रांग दिसत होती.

जोरदार पावसाने बोरी भागात पाणीच पाणी

जोरदार पावसाने बोरी-शिरोडा, पंचवाडी, बेतोडा, निरंकाल गावांना झोडपून काढले. गुरुवार, ६ रोजी पहाटेपासूनच पावसाने जोर धरला होता. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. बोरी, बायथाखोल पेडाकडे, साकवार-तिशे, आजोर्डा-खाजोर्डा भागातील रस्त्यांवरून पाणी वाहत होते.

देवदांडा-बोरी येथील वृत्तपत्र विक्रेते प्रवीण बोरकर यांच्या दुकानाशेजारील साकवाचे तोंड गाळ साठून तुंबल्याने या ठिकाणी पाणी भरले व बोरकर यांच्या दुकानात आणि घरात पाणी शिरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com