
गोव्याचा मोले परिसर हा टॅरॅंट्युले ह्या दुर्मिळ प्रजातीचा अधिवास आहे. पण तेथील नद्यांच्या काठावरील बंधारे, रस्ते रुंदीकरण अशा प्रकल्पांमुळे हा अधिवास नष्ट होत चालला आहे आणि त्यामुळे त्या प्रजातींच्या अस्तित्वावर धोका निर्माण झाला आहे, असे वक्तव्य प्रा. मनोज रमाकांत बोरकर यांनी मोग सन्डेज व्याख्यानमालेतील आपल्या व्याख्यानात केले.
विकास हा पर्यावरण सांभाळूनच केला जातो’ हाच भर प्रा. बोरकर यांनी आपल्या व्याख्यानात दिला. “व्हीप स्पायडर्स, व्हीप स्कॉर्पियन्स आणि टॅरॅंट्युले– ‘नॉट-सो-करिझ्मॅटिक’ वायल्ड लायफ ऑफ गोवा” या विषयावर बोलताना, त्यांनी सांगितले की हे प्राणी विशिष्ट प्रकारच्या नैसर्गिक हवामान व अधिवासावर अवलंबून आहेत. असे हवामान आणि अधिवास कृत्रिमपणे तयार करता येत नाहीत. म्हणून विकासाबरोबरच त्यांच्या अधिवासाची जपणूकही झाली पाहिजे. रविवार, दिनांक २२ जून रोजी हे व्याख्यान आयोजित झाले होते.
टॅरॅंट्युले, व्हीप स्पायडर्स आणि व्हीप स्कॉर्पियन्स यांची संख्या खूप कमी आहे आणि अजूनही या प्रजातींना कोणत्याही शासकीय संरक्षक यादीत स्थान मिळालेले नाही. “या प्राण्यांचा किंवा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमामध्ये उल्लेख नाही,” असेही त्यांनी ह्या वेळेस नमूद केले.
‘मोग’मधील व्याख्यानात या प्राण्यांची शरीररचना, स्वभाव, आणि वर्तनाविषयी माहिती देण्यात आली. उदाहरणार्थ, व्हीप स्कॉर्पियन, ज्याला विनेगरून असेही म्हणतात. हा प्राणी संरक्षणासाठी आपल्या शेपटाचा वापर करून विनेगर सारखा वास येत असलेले द्रव सोडतो, त्या मुळे त्या विनेगरून असे नांव पडले. तर टॅरॅंट्युले बिळात जाळं विणून राहतात, मग तो झाडाचा फटीतला भाग असो किंवा एखादी पाईपलाइन.
व्हीप स्पायडर यांच्यामधील जोडीदार निवडीत लहान नर आघाडी घेतात आणि नवीन सिद्धांतानुसार हे प्राणी प्रजननासाठी आपली शिकारी प्रवृत्ती बाजूला ठेवतात, असे प्रा. बोरकर यांना आपल्या अभ्यासातून दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले.
"गोमंतकीय लोक निसर्गप्रेमी आणि पर्यावरणाबद्दल जागरूक आहेत, पण ते ह्या विषयांवर बोलणे टाळतात. जे बोलतात त्यांना अनेकदा गप्प केले जाते," असेही मत प्राध्यापकांनी मांडले. "पर्यावरणाचे रक्षण करणारे लोक हे विकासविरोधी नसून शाश्वत विकासासाठी आग्रह धरणारे आहेत. आपण निसर्गसंपत्तीला मानवनिर्मित संपत्तीत बदलू शकत नाही," असेही त्यांनी ठाम मत मांडले.
पर्यटनाच्या नैतिक वापराबद्दल बोलताना ते म्हणाले की, इको-टुरिझम जागरूकता वाढवू शकतो, पण अनेकदा याचा उपयोग केवळ मनोरंजन आणि आर्थिक फायद्यासाठीच केला जातो. "पर्यावरणीय नियमाशिवाय शाश्वत पर्यटन शक्य नाही," असे त्यांचे विधान होते.
या व्याख्यानात इकोटुरिझमची भूमिका आणि गोव्याच्या पर्यावरणावर त्याचा संभाव्य परिणाम यावरही चर्चा झाली. त्यात जागरूकता निर्माण करण्याची क्षमता असली तरी, त्याचे लक्ष अनेकदा मनोरंजन आणि व्यावसायिक फायद्याकडे वळले आहे असा बोरकर यांनी इशारा दिला. "पर्यटनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नैतिक असला पाहिजे. मजबूत पर्यावरणीय नियमनाशिवाय, शाश्वतता शक्य नाही," असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.