
रेडीघाट-वाळपई येथे शुक्रवारी रात्री दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढल्याप्रकरणी ट्रकचालक कनिफनाथ गायकवाड (३९, पुणे) याला वाळपई पोलिसांकडून अटक. या अपघातात साखळीतील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
टार्झन, सागर आणि सनिष यांना ११ दिवसांची जेसी टार्झन पार्सेकर, सागर पाटील आणि सनिष घाटवाल यांना खंडणी प्रकरणात म्हापसा न्यायालयाने ११ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गोवा सरकार कृषी क्षेत्रासंबंधी गंभीर नाही. म्हणून कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी पडीक शेतात शॅक सुरु करून पर्यटना आकर्षित केल्यास त्याचा लाभ युवकांना होईल - आमदार विजय सरदेसाई
खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सर्व बसेसमध्ये ५०% सवलत दिली जाईल: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशा मुक्त भारतासाठी पुढाकार घेतला आहे, त्या प्रकारे राज्यातील लोकप्रतिनिधींनी नशा मुक्त गोव्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
अनमोड घाटात बस आणि कारचा भीषण अपघात झाला असून, यात कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
गेल्यावर्षी झालेल्या होमगार्डच्या भरतीसाठी दहावीचे खोटे मार्कशीट सादर केल्याप्रकरणी शायदा आणि अशोक यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोघेही केपे येथील रहिवासी असून, त्यांनी भरतीसाठी खोटे गुणपत्रक सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गेल्यावर्षीय २५ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी खोटे गुणपत्रक सादर केले होते.
अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आंध्रप्रदेशच्या दोघांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. शिवा प्रकाश (२६) आणि विश्वनाथ राजू (२६) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांकडे १.५५ ग्रॅम ईक्सटसी पाऊडर आढळून आली आहे. पोलिसांनी नाईकवाडा येथे छापेमारी करत ही कारवाई केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.