Minor girl Assault: आणखी एका बालिकेचे शोषण, म्‍हापशापाठोपाठ काणकोण हादरले; 4 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, संशयित जेरबंद

Canacona Sexual Assault Case: म्‍हापशानंतर काणकोण तालुक्यातील भाटपाल-श्रीस्थळ येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्‍याने संपूर्ण राज्‍यच हादरले आहे.
Canacona Sexual Assault Case
Canacona Sexual Assault CaseDainik Goamntak
Published on: 
Updated on: 

चावडी: म्‍हापशानंतर काणकोण तालुक्यातील भाटपाल-श्रीस्थळ येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्‍याने संपूर्ण राज्‍यच हादरले आहे. तीन दिवसांतील ही दुसरी घटना ठरली असून, सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

या गंभीर प्रकरणी काणकोण पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित हुसेन शेख याला अटक केली असून, त्याच्याविरोधात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्‍यायालयात उभा केला असता त्‍याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली.

Canacona Sexual Assault Case
Goa Congress RGP Alliance: जागावाटपाबाबत काँग्रेसकडून उशीर, 'आरजी'च्या बारा मतदारसंघांतील प्रमुखांसोबत बुधवारी बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. पीडित चिमुरडी स्थलांतरित कुटुंबातील आहे. संशयित शेख हा मूळ बिहारमधील असून, दोन दिवसांपूर्वीच कामानिमित्त गोव्‍यात आला होता. श्रीस्‍थळ येथे एका बेकरीमध्‍ये तो काम करत होता. काल रात्री संधी साधून त्‍याने चिमुरडीवर लैंगिक अत्‍याचार केल्‍याचा आरोप आहे.

Canacona Sexual Assault Case
Goa T20 Squad: अभिनव तेजराणाकडे टी-20 संघाचे नेतृत्व, अर्जुन तेंडुलकर अजूनही अनफिट; स्नेहल कवठणकरला विश्रांती

घटनेची माहिती समोर येताच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. लहान मुलींच्‍या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काणकोणमधील विविध पंचायत क्षेत्रांसह नगरपालिका परिसरातही पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. बालकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. अशा गंभीर गुन्ह्यांतील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

भाडेकरूंची पार्श्वभूमी तपासण्याची मागणी

परराज्यांतून येणाऱ्या व्यक्तींना घरे किंवा फ्लॅट भाड्याने देताना घरमालकांनी त्यांची संपूर्ण माहिती आणि पार्श्वभूमी तपासावी. तसेच भाडेकरूंची आवश्यक माहिती पोलिसांना देण्याची व्यवस्था प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.