Goa Mining
Goa Mining Dainik Gomantak

Goa Mining Scam: दहा वर्षे भाजप सरकार गप्प का बसले?

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे जर खाण घोटाळ्यात (Goa Mining) अडकले असतील तर...

सांगे: गोमंतकीयांना इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारी, कचरा समस्‍या यासह अनेक ज्‍वलंत प्रश्‍‍नांचा सामना करावा लागत आहे, तरीही भाजपकडून (BJP) काँग्रेसवर (Congress) टीका करणारी भाषणबाजी सुरूच आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Dagambar kamat) हे जर खाण घोटाळ्यात (Mining Scam) अडकले असतील, तर पुराव्‍यांसह दाखवून द्या. केवळ निवडणूक (Election) जवळ येताच आरोप करून जनतेची दिशाभूल करू नका. सरकारी यंत्रणा असतानादेखील दहा वर्षे भाजप सरकार गप्प का बसले? असा प्रश्न करून जो कोणी दोषी असेल त्याच्याविरुद्ध कारवाई करा, असे आव्‍हान काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी दिले.

सांगे मतदारसंघात काँग्रेस पक्ष प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्‍यांनी सदर आव्‍हान दिले. ते म्‍हणाले, फेब्रुवारीत गोव्यात निवडणूक होणार असल्याचा संकेत आहेत. त्‍यामुळे संघटन कार्य मजबूतीसाठी कार्यकर्त्यांनी अधिक वेळ द्यावा. सांगे मतदारसंघातून महिन्याभरात पाच हजार सदस्य बनविण्याची जबाबदारी त्‍यांनी दिली. लोकांना जाऊन भेटा, त्यांच्या समस्या जाणून घ्या, तरच लोक काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहणार असल्याचे गुंडूराव यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, युरी आलेमाव, ज्यो डायस, प्रकाश राठोड, सुनील होन्नावर, राजेश जिगलानी, अभिजित देसाई, गटाध्यक्ष जुसेपिन रॉड्रिगीस, रजनीकांत नाईक व अन्‍य पदाधिकारी उपस्थित होते.

Goa Mining
Goa Politics: मोरजीत मगोप व भाजप मध्ये झेंड्यांचे युद्ध

भाजपकडून आडकाठी

सांगेत जो काही विकास केला, तो काँग्रेस पक्षाने. राज्यात भाजपा विरोधात वातावरण असताना सांगेवासीय वेगळे कसे राहणार. मडगावचे जिल्‍हा इस्‍पितळ भाजपने आठ वर्षे ते उद्‍घाटनाविना रेंगाळत ठेवल्‍याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला. भाजप सत्तर हजार झाडे मारून मोले वीज प्रकल्प उभारू पाहत आहे.

Goa Mining
Goa : झरीचे अस्‍तित्‍व मिटवून रहिवासी प्रकल्‍प?

...तर नऊ वर्षे वाया का?

काँग्रेस पक्ष सांगेत मजबूत होत आहे, म्हणून कार्यकर्त्यांत फूट घालण्‍याचे प्रयत्‍न सुरू आहेत. सुभाष फळदेसाई यांनी काँग्रेस पक्षात लक्ष घालण्यापेक्षा आपल्या पक्षाचे कार्य करावे. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्याची चिंता करू नये, असा इशारा प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला. जर भाजपला खाण महामंडळ करायचे असल्यास नऊ वर्षे का वाया घालविली असा प्रश्न त्‍यांनी उपस्थित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com