Goa Miners: अर्धे वेतनाची मागणी सेवेत असलेल्या खाण कामगारांसाठी नव्हे

ज्या कामगारांना (Goa Miners ) खाण कंपनी व्यवस्थापनाने कामावरून कमी केलेले आहे त्यांच्यासाठीच आहे.
Goa Miners
Goa Miners Dainik Gomantak

डिचोली: अर्धे वेतन द्यावे, ही मागणी सेवेत असलेल्या खाण कामगारांसाठी नव्हे, तर ज्या कामगारांना ज्या खाण कंपनी व्यवस्थापनाने कामावरून कमी केलेले आहे त्यांच्यासाठीच आहे. आयटकशी संलग्न असलेल्या सेझा (वेदांता), व्ही.एम. साळगावकर आदी खाण कंपनींच्या कामगारांनी शुक्रवारी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. खाणबंदीनंतर काही कामगारांना घरी बसावे लागल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासाठीच ही मागणी होती. असे डिचोली सेझा वर्कर्स युनियनचे अध्यक्ष सिद्धेश परब आणि सचिव आत्माराम तिळवे यांनी स्पष्ट केले. या मुद्याचा कोणीही नाहक बाहू करू नये. असा सल्लाही त्यांनी देतानाच, खाणी लवकरात लवकर सूरू व्हाव्यात. या मागणीशी आयटकशी सलंग्न असलेले कामगार ठाम असल्याचे सांगितले.

Goa Miners
Goa Aap: काँग्रेस आणि भाजपा एकाच माळेचे मणी

आयटक नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांच्या नेतृत्वाखाली सेझा (वेदांता), व्ही. एम. साळगावकर आणि अन्य खाण कंपनींच्या कामगारांनी मागील शनिवारी (ता. 3) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची साखळी येथे भेट घेतली. त्यावेळी खाणीं लवकर सुरु करण्याबरोबरच कामावरून कमी केलेल्या आणि संकटात आलेल्या कामगारांना सावरण्यासाठी किमान 50 टक्के वेतन मिळावे. यासाठी लक्ष घालावे. अशी मागणी कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी मुख्यमंत्र्यांजवळ केली. असे सिद्धेश परब आणि आत्माराम तिळवे यांनी सांगितले.

Goa Miners
Goa: "साखळी पालिका कामगारांची छळवणूक होतेय"

साळगावकर कंपनीने घार्से खाणीवरील कामगारांची कपात केल्यानंतर या कामगारांच्या हाती पगार पडत नाही. त्यामुळे त्यांची स्थिती हालाखीची झाली आहे. आता सुर्ला खाणीवरही हीच अवस्था होणार आहे. या कामगारांना आधार मिळावा. म्हणूनच अर्धे वेतनाची मागणी केल्याचे सदानंद सावंत यांनी सांगितले. कंपनीने आम्हाला कामावरून कमी केल्यानंतर आम्ही पुरते अडचणींत आलो आहोत. जगणेच असह्य झालेय. अशी कैफियत कृष्णा बायेकर यांनी मांडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com