Goa Aap: काँग्रेस आणि भाजपा एकाच माळेचे मणी

गोव्यातील (Goa) काँग्रेसचे नेते भाजपात जाऊन घाण राजकारण खेळत आहे.
Goa Aap Atishi
Goa Aap Atishi Twitter/@Atishi
Published on
Updated on

पणजी: गोव्यात काँग्रेस आणि भाजपा एकच पार्टी आहे. गोव्यातील काँग्रेसचे नेते भाजपात जाऊन घाण राजकारण खेळत आहे. या सगळ्या राजकारणाला गोव्यातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेला गोव्यात बदल हवा आहे. त्यासाठी आम आदमी पार्टी गोव्यात आपले जाळे फैलावत आहे. असे आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता आतिषी मारलेना यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आतिषी मारलेना हिचे आज गोव्यात दाबोळी विमानतळावर दुपारी 2.30 वाजता आगमन झाले. त्यावेळी त्यांना विचारलेल्या प्रश्नांना त्या उत्तर देत होत्या. गोव्यातील मलिन राजकारणामुळे गोव्यातील जनता वैफल्यग्रस्त झाली आहे. त्यांना आता स्वच्छ राजकारण हवे आहे. त्यासाठी आपण आपल्या झाडूनेच हे मलीन राजकारण स्वच्छ करू शकते. त्यासाठी आमची गोव्याची वारी असून आपचे इतर राष्ट्रीय नेतेही गोव्यात येऊन गोव्यातील जनतेच्या समस्या जाणून घेतील व गोव्यात या विधानसभा निवडणुकीत आपले खाते खोलणार आहे हे नक्की असे त्या शेवटी म्हणाल्या.

Goa Aap Atishi
GOA AAP: “चला गोव्यातील राजकारण साफ करुया”

आपच्या प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या की काँग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपबरोबर संलग्न होऊन गोव्याचे राजकारण घाणेरडे केले आहे. तसेच भाजपने गोवेकरांचे वोट चोरलेले आहे. भाजप काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू असून या घाणेरड्या राजकारणाला लोक वैतागलेले आहेत तेव्हा आपण त्यांचा पोलखोल करण्यास सज्ज झाले असल्याचे कुतिन्हो म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com