साखळी पालिका कामगारांची छळवणूक, विरोधी गटाचा आरोप.
साखळी पालिका कामगारांची छळवणूक, विरोधी गटाचा आरोप. Dainik Gomantak

Goa: "साखळी पालिका कामगारांची छळवणूक होतेय"

पालिकेत रोजंदारीवर काम करणाऱ्या 17 कंत्राटी कामगारांना (contract workers) कामावरून कमी करण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.
Published on

डिचोली - पगार देण्यावरुन अडवणूक आदी विविध मार्गाने साखळी पालिकेच्या सत्ताधारी गटाकडून पालिका कामगारांची सध्या छळवणूक सुरु आहे. पालिकेत रोजंदारीवर काम करणाऱ्या 17 कंत्राटी कामगारांना (contract workers) कामावरून कमी करण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. असा आरोप पालिकेच्या विरोधी गटाचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष यशवंत माडकर (Yashwant Madkar) आणि नगरसेवक शुभदा सावईकर (Shubhada Sawaikar) यांनी शुक्रवारी साखळीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. कामगारांवरील अन्याय वेळीच थांबवला नाही, तर हा विषय योग्य अधिकारीणीकडे नेण्यात येईल. असा इशाराही विरोधी गटाच्या नगरसेवकांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेस रश्मी देसाई, दयानंद बोरयेकर, आनंद काणेकर आणि ब्रम्हानंद देसाई हे नगरसेवक उपस्थित होते.

तीन महिन्यांपासून पगार नाही

नगराध्यक्ष राया पार्सेकर यांच्याकडून पालिकेच्या कामगारांची सतावणूक सुरु आहे. मागील तीन महिन्यांपासून कालपर्यंत कामगारांना पगार घातलेला नाही. साखळी पालिकेच्या इतिहासात आतापर्यंत पालिका कामगारांची पगाराबाबतीत अडवणूक झाली नव्हती. पालिकेच्या अर्थसंकल्पात कामगारांच्या पगाराची तरतूद केली असतानाही, आत्ताच अडवणूक का? असा प्रश्न यशवंत माडकर यांनी उपस्थित केला.

साखळी पालिका कामगारांची छळवणूक, विरोधी गटाचा आरोप.
Goa: नारायण नाईक यांच्या हल्लेखोरांना लवकर अटक करा: तुळशीदास नाईक

महिला कामगाराची अडवणूक

साखळी पालिकेत कामगारांची सतावणूक कशी चाललीय त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याची सतावणूक. अनुसूचित जमात समाजातील एक महिला पालिकेच्या सेवेतून निवृत्त झाली आहे. मात्र जीपीएफ साठी तिची अडवणूक चालली आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी जीपीएफ संबंधी सोपस्कार केलेले आहेत. मात्र नगराध्यक्ष श्री. पार्सेकर यांच्याकडून या महिलेची अडवणूक चालली आहे. असा आरोप शुभदा सावईकर यांनी केला. कामगारांना पगार वेळेवर मिळाला नाही, तर रोजंदारीवरील कामगारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. बऱ्याच कामगारांना तर घर चालवणेही कठीण बनते. असे सौ. सावईकर म्हणाल्या.

वेतन घातले-नागराध्यक्ष

दरम्यान, शुक्रवारी सकाळी पालिका कामगारांचे वेतन घालण्यात आले आहे. 17 कंत्राटी कामगारांचे कंत्राट संपलेले आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनाचा प्रश्न येत नाही. असे नगराध्यक्ष राया पार्सेकर यांनी त्यांच्याशी संपर्क केले असता, सांगितले. पालिकेतील कारभार व्यवस्थित चालू असून, अभ्यास करूनच निर्णय घेण्यात येतात. असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com